Health : शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा, 15.8% लोकांमध्ये दररोज 'या' समस्यांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

Health : शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा, 15.8% लोकांमध्ये दररोज 'या' समस्यांची वाढ

Headache: डोकं दुखणे ही फार साधारण समस्या आहे. प्रत्येकाला ही समस्या कधीतरी जाणवतेच. मात्र काहींना डोकेदुखीचा नियमित त्रास होतो. अलीकडेच नॉर्विजियन यूनिवर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी अशा रूग्णांचा डेटा जमा करत मोठा खुलासा केलाय.

रिसर्चरच्या मते, जगभऱ्यातील 52% टक्के लोकसंख्या दरवर्षा कुठल्यातरी डोकेदुखीच्या आजाराने ग्रासलेली असते. मायग्रेन, नॉर्मल डोके दुखी यांसारख्या समस्यांचा त्यात समावेश आहे.

टेंशन घेतल्याने डोकेदुखीचा त्रास वाढतो

शास्त्रज्ञांच्या मते, 14% टक्के लोक मायग्रेनच्या समस्येने ग्रासलेले आहेत तर 26% लोक गंभीर चिंतेमुळे डोकेदुखीच्या त्रासाला सामोरे जातात. जगभऱ्यात प्रत्येक दिवशी 15% लोक डोक्याच्या दुखण्याने त्रस्त असतात.

महिलांमध्ये डोकेदुखीचं प्रमाण जास्त

शास्त्रज्ञांच्या मते पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डोकेदुखीचे प्रमाण जास्त असून जगभऱ्यात सतरा टक्के महिला या समस्येने त्रस्त आहेत. मायग्रेनच्या आजाराने अपंगत्वही येऊ शकतं. ५० वर्षाखालील महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: Diwali health : फटाके फोडताय ? डोळ्यांना होऊ शकते गंभीर दुखापत; अशी घ्या काळजी

मायग्रेन वाढण्याची कारणे

दरवर्षी मायग्रेनने त्रस्त लोकांची संख्या वाढत जाते. याची कारणं फिजीकल, बिहेवियरल, एनवायर्नमेंटल आणि सायकोलॉजिकल असू शकतात.