अतिरिक्त व्यायाम, व्यसनाने कमी वयात हृदय विकार

काही तरूण अनेकदा शरिराच्या नैसर्गीक शक्ती पेक्षा अधिकचा व्यायाम करतात किंवा कोणत्याही तज्ञांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः हून अतिरिक्त व्यायाम केला जातो. त्यासोबत अती व्यसनाधिनता हृदय विकाराच्या झटका येण्यास कारणीभूत ठरते आहे
Heart problems
Heart problemssakal media

कोल्हापूर : काही तरूण अनेकदा शरिराच्या नैसर्गीक शक्ती पेक्षा अधिकचा व्यायाम करतात किंवा कोणत्याही तज्ञांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः हून अतिरिक्त व्यायाम केला जातो. त्यासोबत अती व्यसनाधिनता हृदय विकाराच्या झटका येण्यास कारणीभूत ठरते आहे. यातून कमी वयात येणारा हृदयविकाराचे प्रमाणही वाढल्याचे तज्ञांच्या निराक्षणांतून पुढे आले आहे.

अधुनिक पध्दतीच्या व्यायाम साधणाचा वापर करीत व्यायाम केला जातो. काही वेळा स्टिरॉईडची औषधे घेतली जातात. आपल्या शरिरीक क्षमतेचा विचार न करता अतिरिक्त प्रमाणात केलेल्या व्यायामानंतर काही व्यक्तींना अचानक हदयविकाराचे झटके आल्याचे दिसते. यात मुंबईत एका अभिनेत्याला व्यायामानंतर झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अतिरिक्त व्यायामाचे दुष्परिणाम चर्चेत आले. गेल्या पाच वर्षात अचानक येणारा हृदयाच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांनी वाढले आहे. ते कमी करण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे.

या बाबत हृदय रोगतज्ञ डॉ. अक्षय बाफना म्हणाले, ‘‘हदयविकाराचा झटका आल्यानंतर १२० मिनिटाच्या आत त्या रूग्णावर हृदयरोग तज्ञांमार्फत उपचार होणे आवश्यक आहे. अमेरीकेत सरासरी रूग्ण ११० ते १४० मिनिटात रूग्णालयात पोहचतो. भारतात सहा तास ते तीस तास इतक्या विलंबाने पोहचतो तर कोल्हापूरातील प्रमाण ३ तास ते चोवीस तास असे आहे. त्यामुळे हृदयविकारातील अचानक येणाऱ्या झटक्यात ६० टक्के व्यक्तींचे मृत्यू होतात. तंबाखू सेवन तसेच मद्यपान करण्याचे प्रमाण १५ ते ३९ या वयात वाढत आहे. त्यामुळे वयाच्या ६० पूर्वीच लठ्ठपणा, मधूमेह तसेच अचानक हृदयाचा झटका येण्याचे प्रमाणही वाढते आहे. पामतेल, तंबाखू सेवन, धुमपान, मद्यपान, साखर, शीतपेय, मीठ यांच्या अतिवापरातून हृदयविकार तसेच लठ्ठपणाची लक्षणे वाढतात. यातून हृदयाचा झटका व मृत्यू वाढत आहेत.’’

दृष्टीक्षेप

  • साखर, शीतपेय कमी केल्यासः मधूमेह व लठ्ठपणा प्रमाण ३ टक्के कमी होईल

  • पामतेल, साखर, तंबाखू, मीठ कमी केल्यासःहृदयविकार व पक्षाघाताचे ५ टक्के कमी होईल

  • धुम्रपान मुक्त केल्यासः हृदय विकार व पक्षाघात २५ टक्के कमी होईल

  • तंबाखू बंद व मीठाचे प्रमाण कमी केल्यासः३० टक्के हृदयविकाराचे धोके कमी होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com