जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

व्यायाम, श्वसनप्रकार आणि सामूहिक शारीरिक उपक्रमांमुळे ताण, नैराश्य, चिंता कमी होऊन मन प्रसन्न, आत्मविश्वास वाढलेला आणि जीवनमानाचा दर्जा उंचावलेला राहतो
Regular physical activity can support mental well-being, reduce symptoms of anxiety and depression, improve sleep and help build confidence.

Regular physical activity can support mental well-being, reduce symptoms of anxiety and depression, improve sleep and help build confidence.

Sakal

Updated on

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

‘‘आज खूप ताण आहे... काहीच करण्याची इच्छा होत नाही... सतत थकल्यासारखे वाटते...’’ अशी वाक्ये आपल्या आजूबाजूला तुम्ही ऐकली आहेत का? निराश मनःस्थितीत हालचाल करायची इच्छा न होणे किंवा खूप मानसिक तणावात जरा व्यायाम केला, की उत्साही आणि तणावमुक्त वाटणे हे शरीर आणि मनाचा अतूट संबंध आहे हेच दर्शवतात. सततची धावपळीची जीवनशैली, वाढलेला स्क्रीनटाईम, अपुरी झोप, कमी झालेला सामाजिक संपर्क यामुळे होणाऱ्या चिंता, अस्वस्थता यांच्या तीव्रतेत शारीरिक हालचालींच्या अभावाची भर पडते. जीवनमानाच्या गुणवत्तेच्या संकल्पनेप्रमाणे एखाद्या व्यक्तीसाठी मानसिक आरोग्य हा पैलू शारीरिक आरोग्याइतकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही गुणवत्ता राखताना मनाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com