
डॉ. मालविका तांबे
आहाराबद्दल सगळीकडे बऱ्याच चर्चा चालू असतात. काय खावे, काय खाऊ नये याचा विचार केल्यावर धान्य, डाळ , भाज्या, फळे इत्यादींमधील काय चांगले आहे व काय वाईट आहे याची एक लांब यादी मिळेल, परंतु या मार्गदर्शनामध्ये आपल्या रोजच्या आहारातील ९५ टक्के पदार्थांमध्ये वापरा जाणारा एक पदार्थ
मीठ – याबद्दल कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. गोड वा तिखट आपल्या आहारातून वर्ज्य केले तरी फरक पडत नाही पण मिठाशिवाय अर्थात अळणी पदार्थांचा एकही घास गिळणे कठीण जाते. फक्त मनुष्यालाच नव्हे तर गुरांनाही गोठ्यात चाऱ्याबरोबर मिठाची ढेप लावण्याचाही पद्धत आहे.