

Ban Urged on Carbide Guns
sakal
महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटीच्या अध्यक्षा आणि डोंबिवलीतील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी देशभरात वाढत्या नेत्र अपघातांच्या पार्श्वभूमीवर 'कार्बाइड गन' आणि स्फोटक फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे अटकाव करण्याची मागणी केली आहे.
ऑल इंडिया ऑप्थाल्मॉलॉजिकल सोसायटीच्या अहवालानुसार, भोपाळ येथे १५० हून अधिक मुले केवळ कार्बाइड गनच्या स्फोटांमुळे जखमी झाली असून, यातील काहींना दृष्टी गमवावी लागली आहे. पुणे, मध्य प्रदेश आणि चंडीगड येथेही अशाच अनेक भीषण घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, या अपघातांमध्ये लहान मुलेच सर्वाधिक बळी ठरत आहेत.