
-रुपेश कदम
पावसाळा आला की वातावरणात आल्हाददायक गारवा येतो, पण त्याचबरोबर अनेक आजारांचंही आगमन होतं. यात डोळ्यांच्या संसर्गाचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेलं दिसून येतं. या ऋतूमध्ये व्हायरल कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच ‘डोळ्यांचा फ्लू’ विशेषतः मोठ्या प्रमाणावर पसरतो. उष्णतेनंतर आलेल्या दमट हवामानात सूक्ष्मजंतूंना पोषण मिळतं आणि त्यांना वाढीला चालना मिळते. परिणामी डोळ्यांचे संसर्ग हे अधिक तीव्रतेने उद्भवतात. - डॉ. निशा चौहान, सल्लागार नेत्ररोगतज्ज्ञ