प्रश्र्न १ - माझे वय ६७ वर्षे आहे. अन्नपचन नीट होत नाही असे मला जाणवते. काहीही खाल्ले की पोट जड होते तसेच पोटात कळ मारल्यासारखे वाटते. असे वाटते की, माझी पचनसंस्था पूर्णपणे कोरडी झाली आहे. काय उपाय करता येईल ते सुचवावे.
- अरविंद लघाटे, पुणे
उत्तर - वय वाढते तसे तसे संपूर्ण शरीरात कोरडेपणा यायला लागतो, याला अन्नपचनसंस्थाही अपवाद नाही. कोरडेपणा आल्यामुळे अपचन होणे तसेच पोट नीट साफ न होणे ही तक्रार अनेकांच्या बाबतीत आढळते. रोजचे प्यायचे पाणी निदान २० मिनिटे उकळलेले असावे. पाणी उकळताना त्यात जलसंतुलन व २४ कॅरटचे सोन्याचे नाणे घालावे. असे उकळलेले पाणी सामान्य तापमानाला आल्यावर पिण्याने पचन सुधारायला तसेच पचनसंस्थेचा कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळेल.