
Marburg Virus Alert: मारबर्ग व्हायरस हा एक अत्यंत घातक व्हायरस असून तो रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो आणि अंतर्गत रक्तस्राव होण्यास कारणीभूत ठरतो. हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा एख जूनोटिक व्हायरस आहे.
जर तुमच्या आजूबाजूला कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यांतून रक्त येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे त्या व्यक्तीसाठी जीवघेणे ठरू शकते. सध्या आफ्रिकेतील रवांडा देशात मारबर्ग व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आतापर्यंत शेकडो लोक या व्हायरसच्या विळख्यात आले आहेत, आणि त्यापैकी 15 लोकांचा मृत्यू झाला आहे.