महापूर ओसरला...आता आरोग्याची अशी घ्या काळजी

mahad flood
mahad floodsakal

-- सायली जोशी–पटवर्धन

महापुरादरम्यान आणि त्यानंतर चिपळूण, कोल्हापूर, सांगली, रायगड याठिकाणची झालेली अवस्था आपण पाहिली. इथं पूराचं पाणी आता ओसरत आलं आहे. मात्र, त्यानंतर संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दिर्घकाळ पाण्यात किंवा दमट ठिकाणी राहिल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी इथं उद्भऊ शकतात. यामध्ये श्वसनाच्या आजारांपासून त्वचेच्या आजारांपर्यंत अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. (flood has receded now take care of your health with this tips aau85)

पुरामध्ये आलेली ओल आणि पूर ओसरल्यावर येणारी कोरड हे टप्पे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करतात. विशेषत: पुराचे पाणी ओसरल्यावर पूर प्रभावित भागात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता असते. पुराचे पाणी, सांडपाणी आणि इतर अनेक दूषित घटक पाण्यात मिसळल्यामुळे रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुराचा सामना करणाऱ्या प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबियांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरीक यांची या सर्व काळात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

ही काळजी कशी घेता येईल यासाठी ‘सकाळ’नं आयएमएचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी याबाबत दिलेली माहिती आणि उपाययोजना जाणून घेऊया....

  • संसर्गजन्य आजार

१. कीटकांमुळे पसरणारे आजार

अ) डासांमुळे - मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुन्या

ब) माश्यांमुळे- कॉलरा, टायफॉईड, अतिसार

२. दूषित पाण्यामुळे पसरणारे आजार- उलट्या, जुलाब (अतिसार, हगवण- डिसेन्ट्री), आमांश, टायफॉईड, कावीळ (हिपॅटायटिस-ए), लेप्टोस्पायरोसिस, जंत, डोळे येणे

३. ओल पसरल्यामुळे - सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप, दमा, ब्रॉन्कायटिस, सांधेदुखी

४. पाण्यात खूप काळ भिजल्यामुळे त्वचेचे आजार - गजकर्ण, खाज, चिखल्या

  • असंसर्गजन्य आजार

१. पुरामध्ये पाण्यातील साप किंवा इतर किटक घरात शिरतात. त्यामुळे सर्पदंश किंवा इतर किटकांनी चावा घेणे असे प्रकार होऊ शकतात.

२. पुराच्या अनुभवातील मानसिक धक्क्यांनी, झालेल्या नुकसानीमुळे - चिंता, नैराश्य, तीव्र भीती (फोबिया), घबराट (पॅनिक)

प्रतिबंधात्मक उपाय-

  • खाताना, जेवताना, हात स्वच्छ धुवावेत. खाण्यासाठी वापरली जाणारी ताटे, वाट्या, पाण्याचे ग्लास स्वच्छ ठेवावेत.

  • क्लोरीन टॅब्लेटने पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवावे

  • नियमित अंतराने कोमट पाणी प्यावे

  • ओआरएस नियमितपणे प्यावे

  • अन्नपदार्थ झाकून ठेवावे

  • पूर ओसरल्यावर घराजवळच्या भागात पाणी साचू देऊ नये

  • पुराच्या पाण्याशी शक्य तितका कमी संपर्क येईल असे पाहावे

  • संसर्गजन्य लोकांपासून दूर राहा कारण बरेच रोग संक्रमक असतात

  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा

  • तीव्र ताप, डोकेदुखी, मळमळ, डोळ्याची लालसरपणा, अतिसार, भूक न लागणे इत्यादी लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी.

  • याबरोबरच मानसिक स्वास्थ्य हाही अतिशय महत्त्वाचा विषय असून आपल्या आजुबाजूच्या लोकांना मानसिक आधार देणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

  • पुरात काही जनावरे किंवा पाळीव प्राणी यांचे प्राण गेलेले असू शकतात. हे प्राणी दिर्घकाळ पाण्यात राहिल्याने त्यापासूनही काही संसर्ग होऊ शकतो. तेव्हा आपल्या आसपास असे काही नाही ना याची खात्री करा. तसे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com