Health Care : टायफॉईडमधून बरे झाल्यानंतर अशक्तपणा जाणवतोय? मग, अशा प्रकारे घ्या काळजी

Typhoid fever is a serious infection caused by bacteria. You can get the disease by eating food, drinking water or atmosphere that is contaminated with the bacteria. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जण आजारी पडतात. वातावरणातील थंडाव्यामुळे सर्दी-ताप, खोकल्यासोबत इतर अनेक आजार जडतात. या आजारांमध्ये टायफॉईडचा ही समावेश आहे.
Health Care
Health Careesakal

Health Care : थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जण आजारी पडतात. वातावरणातील थंडाव्यामुळे सर्दी-ताप, खोकल्यासोबत इतर अनेक आजार जडतात. या आजारांमध्ये टायफॉईडचा ही समावेश आहे. टायफॉईड हा खूप धोकादायक आजार आहे. हा एक प्रकारचा जिवाणू संसर्ग आहे, जो दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो.

या आजारामध्ये व्यक्तीच्या आतड्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे, या आजारातून बाहेर पडल्यानंतर ही व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे, आरोग्याची खास काळजी घेणे, महत्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला टायफॉईडमधून बरे झाल्यानंतर आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यायची? त्याबद्दल सांगणार आहोत.

Health Care
Health Care : हिवाळ्यात खायलाच हवा हरभरा, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

टायफॉईमधून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारे घ्या काळजी :

पौष्टिक आहार घ्या

टायफॉईडमधून बाहेर पडल्यानंतर, शरीरात प्रचंड अशक्तपणा जाणवतो. यातून बरे होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करा. या पदार्थांमुळे तुमच्या शरीरात ऊर्जा वाढण्यास मदत होईल. (Eat nutritious food)

या पदार्थांमध्ये प्रथिनांनीयुक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि धान्य इत्यादी घटकांचा समावेश करायला विसरू नका. यामुळे, तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल.

शरीर हायड्रेटेड ठेवा

टायफॉईडमध्ये आपल्या शरीरातील आतड्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. यासोबतच, ताप, उलट्या आणि जुलाबामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. ज्यामुळे, शरीराला अशक्तपणा येतो. त्यामुळे, या अशक्तपणाला दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या. (Keep the body hydrated)

पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे, शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते, आणि शरीरामध्ये तरतरी येते. पाण्याव्यतिरिक्त फळे, आणि भाज्यांचा रस आणि नारळपाणी यांचा आहारात समावेश करा. या सर्व घटकांमुळे शरीर हायड्रेटेड राहते.

विश्रांती घेणे महत्वाचे

टायफॉईडमधून बरे झाल्यानंतर शरीरात मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवतो. पुरेसे खाल्ल्यानंतर ही शरीरात ऊर्जेचा अभाव आढळतो. त्यामुळे, अशा स्थितीमध्ये शरीराला जास्त काम करावे लागेल, अशी कोणतीही क्रिया करू नका. जास्त काम करणे, शक्यतो टाळा. (Rest is important)

तुमचे शरीर आधीच कमकुवत आहे, जर तुम्ही या स्थितीमध्ये जास्त काम केले तर तुम्ही बरे होण्याऐवजी तुमचे आरोग्य अधिक बिघडण्याची दाट शक्यता असू शकते. त्यामुळे, पुरेशी विश्रांती घ्या, आहार घ्या, तणावमुक्त रहा आणि चांगली झोप घ्या.

(Here's how to take care after recovering from typhoid)

Health Care
Health Care : दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने करण्याऐवजी कोमट पाण्याने करा, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com