

What is an Allergy in Children
Sakal
डॉ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)
आरोग्याचे ‘बाळ’कडू
जेव्हा शरीराची प्रतिकारकशक्ती एखाद्या गोष्टीला उदा. अन्न, परागकण, धुळीचे कण (डस्ट माईट), पाळीव प्राण्यांच्या अंगावरचा कोंडा (डॅंड्रफ) यांना असाधारण प्रतिसाद देते, तेव्हा त्याला त्या गोष्टींची ॲलर्जी आहे, असे म्हणतात आणि या असाधारण प्रतिसादाला ‘ॲलर्जी’ असे म्हणतात. मुलात अन्नातून होणाऱ्या, श्वासावाटे होणाऱ्या, त्वचेच्या ॲलर्जीचे; तसेच कीटक चावल्याने व मेडीसिन घेतल्याने होणाऱ्या ॲलर्जीचे प्रमाण अधिक आहे.