अन्नाची विषबाधा

दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यामुळे फूड पाॅइजनिंग (अन्नविषबाधा) होते. जीवाणूंपासून ‘टाॅक्झिन्स’ची निर्मिती होते आणि त्या टाॅक्झिन्समुळे अन्न दूषित होते.
Food Poisoning

Food Poisoning

sakal

Updated on

- डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यामुळे फूड पाॅइजनिंग (अन्नविषबाधा) होते. जीवाणूंपासून ‘टाॅक्झिन्स’ची निर्मिती होते आणि त्या टाॅक्झिन्समुळे अन्न दूषित होते. स्टॅफिलोकाॅकस जीवाणूमुळे दूषित झालेले अन्न खाल्ल्यास फूड पाॅइजनिंग होते आणि लगेचच लक्षणे दिसून येतात. रुग्णाला मळमळ, उलट्या व्हायला लागतात. ही टाॅक्झिन्स शरीराबाहेर पडतात, रुग्णाला बरेही वाटायला लागते. इतर प्रकारच्या फूड पाॅइजनिंगमध्ये लक्षणे जरा उशिराने दिसून येतात. त्यात साल्मोनेला किंवा शिगेला (Shigella) या सूक्ष्मजीवांच्या इन्फेक्शनचा समावेश असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com