
Satyapal Malik Death Reason Explained: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल, सत्यपाल मलिक यांचं आज (मंगळवारी) निधन झालं. दीर्घकाळापासून आजारी असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बिहार, गोवा, मेघालय आणि जम्मू- काश्मिर सारख्या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केलेल्या मलिक यांच्या निधनामुळे राजकिय क्षेत्रात तसेच संपूर्ण भारतात शोकाकुळ झाला आहे.
माहितीनुसार त्यांना लघवी करताना होणाऱ्या वेदना आणि त्रासामुळे मे महिन्यात दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. त्यानंतर तपासण्या केल्या असता त्यांना यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन (UTI) झाल्याचे समोर आले होते. परंतु औषधोपचार केल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली. पण हा UTI नेमका असतो तरी काय, त्याची लक्षणे कोणती आणि हा आजार कोणत्या कारणांमुळे होतो? याबद्दल सविस्तर माहितीसाठी पुढे वाचा.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) ही किडनीसंबंधी आढळणारी एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. याची लक्षणं लघवीमध्ये दिसू शकतात. हे इन्फेकशन मूत्रपिंड प्रणालीतील कुठल्याही भागात, जसेकी मूत्रपिंड (किडनी), युरेटर्स, मूत्राशय (ब्लॅडर) किंवा युरेथ्रा (लघवीचा मार्ग) इथे होऊ शकते. बहुतेक वेळा यूटीआयचा परिणाम मूत्राशयावर किंवा युरेथ्रावर होतो, मात्र काही गंभीर प्रकरणांमध्ये हा संसर्ग मूत्रपिंडांपर्यंत पोहोचू शकतो.
यूटीआय प्रामुख्याने बॅक्टेरियामुळे होतो, पण कधीकधी व्हायरस किंवा फंगी युरिनरी ट्रॅक्टमध्ये प्रवेश करतात आणि वाढतात. यामुळे देखील UTI होण्याची शक्यता असते. योग्य वेळी उपचार न घेतल्यास यूटीआय गंभीर स्वरूप धारण करू शकतो, म्हणून त्याची लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
वारंवार लघवी होणे
लघवी करताना जळजळ किंवा वेदना
लघवीमध्ये दुर्गंधी किंवा रक्त येणे
खालच्या पोटात किंवा पाठीमध्ये वेदना
ताप येणे किंवा अंग थंडीने कुडकुडणे
यूटीआयचे सर्वात सामान्य कारण म्हणजे बॅक्टेरिया.
विशेषतः Escherichia coli (E. coli) हा जीवाणू यूटीआयला कारणीभूत ठरतो.
हे जीवाणू आतड्यांमधून किंवा त्वचेवरून मूत्रमार्गात प्रवेश करतात, ज्यामुळे तिथे बॅक्टेरिया वाढतात आणि संसर्ग होतो.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष, अपुरं पाणी पिणं, आणि इतर काही वैद्यकीय स्थितीमुळे बॅक्टेरियांचा सहज पसरू शकतो.
रोज 8-10 ग्लास पाणी प्या
लघवी रोखण्याची सवय टाळा
स्वच्छतेची काळजी घ्या, विशेषतः जननेंद्रियांची
असुरक्षित लैंगिक संबंध टाळा
लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.