

Hemifacial Spasm is caused by pressure on the facial nerve and can often be permanently treated with Microvascular Decompression Surgery.
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन
मेंदू आणि मणक्याच्या विविध आजारांबद्दल लिहिताना पुढच्या काही लेखांमध्ये गेल्या पंचवीसएक वर्षात घडलेल्या काही स्मरणीय गोष्टी एकएक करून लिहाव्यात असा माझा विचार आहे. या गोष्टींमधून निश्चितच काही वैद्यकीय माहिती लोकांपर्यंत पोहोचेल.
साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या एमव्हीडी शस्त्रक्रियेच्या केंद्रामध्ये एक कुटुंब आलं. त्यातल्या तरुण मुलाला चेहऱ्याच्या उजव्या बाजूला वारंवार आकुंचन होण्याचा त्रास होता. म्हणजेच हेमिफेशिअल स्पाझम हा त्रास त्याला तीन वर्षांपासून सुरू होता, आणि आता हळूहळू वाढत चालला होता. साधारण २६ वर्षे वयाचा हा तरुण. चार वर्षांपूर्वी लग्न झालेलं. त्याची बायको आणि आई, मावशी त्याच्याबरोबर आले होते.