Fruits In Summer : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी खायलाच हवीत ‘ही’ फळे, आजारांपासून होईल बचाव

Fruits In Summer : उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, या दिवसांमध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पाण्याची कमतरता भासली की, मग डिहायड्रेशनचा त्रास संभवतो.
Fruits In Summer
Fruits In Summeresakal

Fruits In Summer : उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, या दिवसांमध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पाण्याची कमतरता भासली की, मग डिहायड्रेशनचा त्रास संभवतो. अशा परिस्थितीमध्ये मग, द्रवपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त या ऋतूमध्ये हंगामी फळांचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. तसेच, उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून ही बचाव होतो.

या हंगामी फळांमुळे डिहायड्रेशनपासून आपल्या शरीराचे संरक्षण होते. शिवाय, थकवा आणि आळस दूर करण्यासाठी ही फळे तुमच्यासाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात कोणती फळे खाणे फायदेशीर आहे?

Fruits In Summer
Summer Animal Care: तुमच्याही घरी पाळीव प्राणी असेल तर उन्हाळ्यात 'अशी' घ्या काळजी

आंबा

फळांचा राजा आंबा हा तर सर्वांनाच खायला आवडतो. या फळाची लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण वाट पाहत असतात. हे चवदार फळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आंब्यापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. मॅंगो शेक, गोड-आंबट चटणी, आमरस, सॅलेडही बनवले जाते.

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर आणि इतर पोषकघटक आढळतात. या सिझनमध्ये आंबा खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी सामान्य होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आंबा फायदेशीर मानला जातो. त्यामुळे, या दिवसांमध्ये आंबा अवश्य खा. (Mango)

खरबूज

खरबूज या फळामध्ये आरोग्याचा खजिना लपलेला आहे. खरबूज हे फळ चवीला सौम्य गोड लागते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे विपुल प्रमाण आढळून येते. या दोन्ही घटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

या शिवाय, खरबूजमध्ये पोटॅशिअम आढळते, जे रक्तदाबासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये आढळून येणारे बीटा कॅरोटीन हे आपले डोळे निरोगी ठेवण्याचे काम करते. त्यामुळे, या फळाचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करा. (Muskmelon)

कलिंगड

उन्हाळ्यातील कडक झळांपासून शरीराला आराम मिळवून देण्यासाठी कलिंगड हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते. कलिंगडामध्ये 90% पाण्याचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, या फळाचे सेवन केल्यावर आपल्या शरीराला पाण्याचा पुरवठा होतो आणि ऊर्जा मिळते.

शिवाय, या फळामध्ये भरपूर फायबर, पोटॅशिअम, लोह आणि इतर अनेक घटक असतात. त्यामुळे, कलिंगडाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Watermelon)

Fruits In Summer
Dehydration Symptoms : आला उन्हाळा तब्येतीला सांभाळा! उष्णतेमुळे होणारे डिहायड्रेशन काय आहे? जाणून घ्या लक्षणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com