Garbhsanskar
sakal
प्रश्न - आम्ही साऊथ आफ्रिकेत राहतो. तिथे गर्भ संस्कार करता येतील का? संतुलनचे कुठले चिकित्सक तिथे मार्गदर्शन करू शकतील का? व तसेच गर्भ संस्कार करत असताना ऍलोपॅथिक औषधं घेता येऊ शकतील का?.
- शीतल जोशी, जोहानेसबर्ग
उत्तर - गर्भ संस्कार संपूर्ण जगभरात कुठेही करता येऊ शकतात. फक्त गर्भ राहण्यापूर्वी जे बीज संस्कार असतात, त्याकरता पंचकर्म उपचारापुरतं कारल्याला आत्मसंतुलन केंद्रामध्ये येऊन पंचकर्म केलेलं जास्त उत्तम राहील. त्यानंतर योग्य आचरण, रसायन सेवन, शुक्र पोषक औषधांचे सेवन हे सगळे संतुलनच्या चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली कुठेही करता येऊ शकतं. दर महिन्याला फोनवरती अशा प्रकारच्या सूचना देणं शक्य असतं.
डॉक्टर बालाजी तांबे यांचं आयुर्वेदिक गर्भ संस्कार पुस्तक व तसेच यूट्यूब वरचे त्यांचे व डॉक्टर मालविका तांबे यांचे विडियो मार्गदर्शन सुद्धा मदत करू शकेल. गर्भ संस्कार हे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी करायचे असतात, त्यामुळे आवश्यकतेनुसार ऍलोपॅथिक औषधं किंवा तुम्हाला पटत असतील त्या प्रकारची कुठलीही औषध करणं शक्य असतं.
मात्र, आत्तापर्यंतच्या आपल्या अनुभवानुसार असं दिसतं की व्यवस्थितपणे गर्भ संस्कार केल्यास सहसा इतर कुठल्याही औषधांची गरज पडत नाही. आपण सविस्तर माहितीकरता संतुलनच्या चिकित्सकशी संपर्क करू शकता.