आरोग्यमंत्र : जेनेरिक, ब्रँडेड औषधे आणि पेटंट generic branded medicine and patent health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Generic Medicine

आरोग्यमंत्र : जेनेरिक, ब्रँडेड औषधे आणि पेटंट

- डॉ. अजय कोठारी / डॉ. सिंपल कोठारी

सर्वप्रथम जेनेरिक औषध म्हणजे समजून घेऊ. जेनेरिक औषध त्याच्या घटक पदार्थ किंवा कोणत्याही फार्मा कंपनीने नोंदणीकृत असलेल्या नावाने बनवले आणि विकले जाऊ शकते. जेनेरिक ही ब्रँडेड औषधसुद्धा असतात. उदा. पॅरॉसिटामॉल हे केमिकल नाव जेनेरिक म्हणून विविध कंपनी आपले ब्रँडेड नाव देऊन विकतात.

पेटंट औषध म्हणजे काय ते समजवून घेऊ. ही औषधे मूलतः वैज्ञानिक संशोधनाद्वारे परदेशात अमेरिका किंवा युरोपमधील फार्मास्युटिकल कंपनीने बनवलेली असतात.

पेटंट संरक्षण कायद्यांतर्गत इतर कोणतीही फार्मा कंपनी त्यांना हे औषध विकसित करण्यासाठी लागणारा खर्च वसूल करण्यासाठी पेटंट संरक्षण कालावधीपर्यंत बनवू शकत नाही.

पेटंटमध्ये विकासाच्या संपूर्ण कालावधी आणि तो तयार होईपर्यंत तो साधारणपणे २० वर्षे असतो. म्हणून अनेकदा पेशंट विचारतात या औषधावर कोणते कोणते जेनेरिक पर्याय उपलब्ध नाही का? त्याचे हेच कारण आहे म्हणजे पेटंट कायदा जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कंपनी ते तयार करू शकत नाही. एकदा का हा कालावधी संपली की आपोआप औषधाच्या किमती कमी होतात आणि ती औषधे सगळीकडे सहजपणे उपलब्ध होतात.

जेनेरिक वापरावे की ब्रॅंडेड हा असा प्रश्‍न आहे. परंतु होणारा परिणाम सारखाच उदा. तुम्ही एखादे औषधे ताप कमी करण्यासाठी येत असल्यास जेनेरिक किंवा ब्रँडेड घेतल्यास दोघांमुळे ताप कमी होईल हे नक्कीच. काहींना एखाद्या कंपनीचे औषधाने आपण लवकर बरे होतो व त्यावर अधिक विश्‍वास बसलेला असल्यास त्यास प्लासिबो इफेक्ट असे संबोधिले जाते.

भारतात जेनेरिक औषधे अनेक शासकीय दवाखान्यात वापरली जातात. ती आपल्या नेहमीच्या मेडिकल दुकानावर सहजासहजी मिळत नाही. खासगी कंपन्या तेच घटक असलेली औषध या मेडिकल दुकानांवर ब्रँडेड पॅकिंग करून उपलब्ध करून देतात व त्यामुळे त्या औषधांच्या किमती महाग असतात.

डॉक्टरी शिक्षणात औषध निर्माण शास्त्रामध्ये, औषधांच्या घटकांच्या नावानुसार शिक्षण दिले जाते. डॉक्टरांना ब्रँडेड किंवा जेनेरिक औषध याबद्दल सांगितले जात नाही. हे एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणे आपला माल विकला जावा म्हणून त्या कंपनीच्या औषधाची माहिती देणारा एक प्रतिनिधी नेमला जातो. डॉक्टरांना त्याच ब्रॅंडची खात्री फायदा जाणवल्यास डॉक्टर त्या ब्रॅंडची औषधे लिहितो.

भारतातील कोणत्याही कंपनीने बनवलेल्या जेनेरिकच्या किमतीवर नियंत्रण सरकारचे असते. त्यामुळे सरकारने देशात बनवलेल्या सर्व जेनेरिकची एकसमान गुणवत्ता सुनिश्‍चित करणे आवश्‍यक आहे. जेणेकरून डॉक्टर फक्त औषधांच्या घटकांचे नाव लिहून देऊ शकतील.

आजच्या युगात ऑनलाइन सोयीमुळे रुग्ण आपल्या सोयी व ऐपतीनुसार औषध खरेदी करून घेऊ शकतो. प्रत्येक औषध सरकारला उपलब्ध करून देणे खर्चिक आहे. म्हणून प्रत्येक औषधाचा जेनेरिक स्वस्त असेल व फायदेशीर असणार असे सांगणे कठीण आहे. म्हणून रुग्णांनी औषधे कुठून विकत घेत आहोत. त्याच्या गुणवत्तेची खात्री करून विकत घ्यावी.

टॅग्स :medicinehealth