अडगळीतील अंथरूण काढताय? काळजी घ्या!

शरीरात कोणत्याही प्रकारचे बदल झाल्याने अस्वस्थता जाणवते, त्याला अ‍ॅलर्जी म्हणतात
Getting rid of bed bugs Be careful What is allergy health marathi news
Getting rid of bed bugs Be careful What is allergy health marathi news Sakal
Updated on

थंडी सुरू झाली. त्यामुळे अडगळीत ठेवलेले उबदार कपडे अनेकांनी बाहेर काढले. पण, हे कपडे स्वच्छ नसले तर आजार, ॲलर्जी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ठेवणीतील अंथरूण, पांघरूण वापरात आणण्यापूर्वी उन्हात वाळवावे आणि स्वच्छ ठेवावे; अन्यथा गादी, उशी, चादर, वाकळ, गोधडी यात धूळ साचून तेथे सूक्ष्म कीटक तयार होतात.

त्यापासून ॲलर्जी होऊ शकते. त्याला डस्ट माइट ॲलर्जी किंवा हाऊस डस्ट ॲलर्जी म्हणतात. याशिवाय विशिष्ट अशा आहार, वातावरणाचीही अ‍ॅलर्जी अनेकांना असते. कधीकधी श्वास घेण्यास त्रास होत असेल तर गांभीर्याने घ्या.

अ‍ॅलर्जी वाढवणारे घटक

  • पांघरुणातील कापसामध्ये सूक्ष्म कीटक

  • विशिष्ट प्रकारचा आहार

  • थंड पदार्थ

  • अतिगोड पदार्थ

  • अतिआंबट पदार्थ

  • वातावरणातील बदल

लक्षणे अशी

  • डोळे लाल होणे,

  • डोळ्यांना खाज सुटणे

  • डोळ्यांत पाणी येणे,

  • धुळीमुळे वारंवार शिंकणे

  • नाक सतत गळणे

  • कोरडा खोकला येणे

  • घसा खवखवणे

दुष्परिणाम काय?

  • अनियमित उपचाराने सर्दीचे रूपांतर दम्यात होते

  • रोगप्रतिकार शक्ती कमी होते

  • पंचज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते

  • बौद्धिक कार्य मंदावते

  • जास्त दिवस औषधांचा वापर केल्यास इतर अवयवांवर परिणाम

अ‍ॅलर्जी म्हणजे काय?

शरीरात कोणत्याही प्रकारचे बदल झाल्याने अस्वस्थता जाणवते, त्याला अ‍ॅलर्जी म्हणतात. उग्र गंधांचा सहवास, प्रवास, रात्री फॅनचा वापर, धुळीचे वातावरण तसेच अनेक दिवस स्वच्छ न केलेल्या अंथरुणावर किंवा कापसाच्या गादीतील धुळीत सूक्ष्म कीटक असतात. ही डस्ट माइट ॲलर्जी अनेकांना असते. दर आठवड्यात गाद्या, उशा उन्हात दिवसभर ठेवाव्या. यामुळे सूक्ष्म कीटक नामशेष होतात.

अनेकांना धूळ, धुराची अॅलर्जी असते. त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. लहान मुलांना धुळीची अॅलर्जी असेल तर पालकांना त्यांना खेळणी देताना धुऊन द्यावी. बॉक्समध्ये अनेक दिवसांपासून न वापरलेली खेळणी असेल तर ती पुसून द्यावी. पांघरण्याचे, अंथरण्याचे कपडे किमान १५ दिवसाला धुतल्यास त्यामध्ये धूळ साचणार नाही व त्रास होणार नाही. धुळाची अॅलर्जी असेल तर अगरबत्ती लावण्याचे टाळावे.

- डॉ. मेघा जोगदंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com