

Gopalkrishna: Krishna’s timeless message of values and wellbeing.
Sakal
श्रीकृष्ण एक आदर्श अपत्य. आज ५५०० वर्षांनंतरही श्रीकृष्ण जयंती आणि श्रीकृष्णलीला, श्रीकृष्णांचे महाभागवत यांची पारायणे, प्रवचने भारतवर्षात अत्यंत प्रचलित आहेत. आजही श्रीकृष्ण जयंती उत्सवाचे स्वरूप देऊन साजरी केली जाते. नुसतेच स्वतःच्या आई-वडिलांना बंधनातून मुक्त केले म्हणून नव्हे तर आपले इतर नातेवाईक, मित्रमंडळी, बालगोपाळांपासून ते अक्रूर, यादव, पांडव वगैरे सर्व वयाच्या व अधिकाराच्या लोकांना अभिमान वाटेल असा हा जन्म, असे हे कर्तृत्व आणि असा हा आदर्श.