Heart Pacemaker: तांदळाएवढा पेसमेकर शस्त्रक्रियेशिवाय बसवता येणार हृदयात ! नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीची नवी क्रांती

Biodegradable Heart Pacemaker That Dissolves In The Body: शस्त्रक्रियेशिवाय हृदयात बसणारा तांदळाएवढा पेसमेकर; हृदयरुग्णांसाठी नवसंजीवनी!
Heart Pacemaker| New Innovation In Health Sector
Grain-Sized Pacemaker Implanted Without Surgery sakal
Updated on

New Heart Pacemaker Invention By Northwestern University: आजकाल बदलती जीवनशैली, असंतुलीत आहार, अनियमित झोपण्याच्या वेळा यामुळे अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळते. प्रामुख्याने याचा परिणाम हृदयावर जास्त होऊन हृदय विकाराचे प्रमाण वाढते. तसेच सध्या हृदयविकाराच्या रुग्णांचे वाढते प्रमाण एक चिंतेची घंटा बनले आहे.

परंतु आता ही चिंता दूर करण्यात वैद्यकीय विभागाला यश आले आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक नवे संशोधन केले आहे. त्यांनी एक अत्यंत छोटा आणि तांदळाच्या आकाराचा बायोडिग्रेडेबल पेसमेकर विकसित केला आहे, जो हृदय विकाराच्या रुग्णांसाठी नवी आशा ठरण्याची शक्यता आहे.

पेसमेकरची वैशिष्ट्ये

हा पेसमेकर केवळ 1.8 ते 3.5 मिमी इतका लहान आहे की तो इंजेक्शनद्वारे थेट रुग्णाच्या शरीरात शस्त्रक्रियेविना बसवता येतो. विशेष म्हणजे, हृदयाचे ठोके नियमित झाल्यानंतर हे उपकरण साधारणतः ५ ते ७ आठवड्यांत शरीरात पूर्णपणे विरघळते. यामुळे त्याला काढण्यासाठी कोणतीही दुसरी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता राहत नाही.

पेसमेकर कसे काम करतो?

पेसमेकर एक छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे हृदाच्याठीक्यांवर नियंत्रण ठेवते. मुख्यतः अनियमित ठोके जाणवणाऱ्या एरिथमिया या स्थितीत पेसमेकरचा उपयोग होतो. सध्या वापरले जाणारे लीडलेस पेसमेकर आकाराने छोटे असले, तरी ते हृदयात बसवण्यासाठी एक खास ट्यूब (कॅथेटर) वापरावे लागते. पण नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीने (Northwestern University) तयार केलेला हा नविन पेसमेकर (Pacemaker) इतका छोटा आहे की तो इंजेक्शनच्या सुईच्या टोकावर मावतो, आणि तो कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता शरीरात सहज बसवता येतो.

कोणासाठी आहे फायदेशीर?

सुरवातीच्या चाचण्यांमध्ये हा पेसमेकर विशेषतः जन्मजात हृदयाल दोष असलेल्या नवजात बालकांसाठी, तसेच हृदय शस्त्रक्रिया झालेल्या तरुणांसाठी प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पारंपरिक जड रचना असलेल्या पेसमेकरच्या तुलनेत यात कोणत्याही तारा, बॅटरी नाहीत त्यामुळे हा अधिक सुरक्षित आणि साधा आहे. या पेसमेकरमुळे कोणत्याही वेदनाही होत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com