Guava Benefites : एक दोन नाही तर ७ आजारांवर गुणकारी आहे पेरू, जाणून घ्या कधी आणि कसं खावं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guava Benefites

Guava Benefites : एक दोन नाही तर ७ आजारांवर गुणकारी आहे पेरू, जाणून घ्या कधी आणि कसं खावं...

Guava Benefites : पेरू फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी खावं असं म्हणतात ते काही उगाच नाही. कारण पेरू चक्क ७ आजारांवर उपयुक्त ठरतात. त्यामुळेच पेरूला अमृतपण म्हटलं जातं. जाणून घेऊया कोण कोणत्या आजारांवर पेरू उपयुक्त ठरतात.

बध्दकोष्ठता

इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये फायबर सर्वात जास्त असते. एका पेरूत १२ टक्के फायबर असल्याने पचन आणि आरोग्याविषयीच्या अनेक समस्यांवर उपाय होतो. यामुळे पोटाचा मोटाबोलिक रेट सुधारतो आणि बॉवेल मुव्हमेंट फास्ट होतो. बध्दकोष्ठतेसाठी रिकाम्या पोटी मीठ लावून पेरू खाऊ शकतात.

हेही वाचा: Health Tips : वारंवार तोंड कोरडं पडतंय? असू शकतात 'हे' गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

डाबेटीस

पेरूमध्ये फायबर आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे ते डायबेटीस रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. हे शुगर स्पाईक थांबवतं आणि डायबेटीसमध्ये बध्दकोष्ठतेची समस्या दूर करतं. यात मधूमेहींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जास्त बिया असलेला पेरू काळं मिठ लावून खावा.

हेही वाचा: Health Tips : तुम्ही देखील दुसऱ्यांचा कंगवा वापरताय? 

पोट फुगणे (ब्लोटींग)

महिलांमध्ये ब्लोटींगची समस्या बऱ्याचदा जास्त दिसते. विशेषतः पिरीयडसच्या आसपासच्या काळात हा त्रास अधिक जाणवतो. यासाठी काळं मीठ लावून दिवसा पेरू खावा. पोटातली सूज कमी करून ब्लोटींगची समस्या कमी होऊ शकते.

हार्ट प्रॉब्लेम

पेरूमध्ये सोडीयम आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. यामुळे रक्तवाहिन्या हेल्दी पाहण्यास आणि बीपीची समस्येला बॅलेंस करण्यासाठी मदत होते. यासोबत हे फळ चांगल्या कोलेस्ट्रॉलाचा स्तर वाढतो आणि हृदय हेल्दी राहतं.

हेही वाचा: Health Tips : लद्दाखचं हे फळ फक्त मधुमेहच नव्हे तर कँसरसारख्या आजारालाही पळवेल दूर, वाचा सविस्तर

वजन कमी करण्यासाठी

पेरू खाल्ल्याने बऱ्याच कॅलरीज कमी होतात. त्यामुळे तुम्हाला हेल्दी राखण्यास आणि वजन कमी करण्यासाठी पेरू फार उपयुक्त ठरतो. शिवाय पेरूत फायबर अधिक असल्याने मेटाबोलिक रेट वाढून बेली फॅट कमी होण्यास मदत मिळते.

सर्दी खोकल्यावर परिणामकाराक

सर्दी खोकल्यावर पिकलेला पेरू उपयुक्त ठरतो. हे फार असरदार आहे. पेरुमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं त्यामुळे सर्दी, खोकल्यावर ते परिणामकारक सिद्द होतं. यामुळे श्वसन मार्गातलं म्युकस दूर होतो. आणि श्वसन मार्ग, घसा, फुफ्फूस साफ करून सर्दी खोकल्याची समस्या दूर करतात.

दृष्टी सुधारणयासाठी

पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असतो. त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी त्याची मदत होते. पेरू खाल्ल्याने फक्त दृष्टी सुधारते एवढच नाही तर यामुळे मोतीबिंदूसारखी समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :health