A healthy gut leads to a healthier body and mind – don’t ignore your digestion!Sakal
आरोग्य
Gut health: आतड्याचे आरोग्य- पचनसंस्थेच्या स्वास्थाकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते एक मोठी चूक
पचनाच्या समस्यांमध्ये अचानक झालेल्या या वाढीचे मूळ आधुनिक शहरी जीवनाच्या व्यवस्थेमध्ये सापडू शकेल. जेवणाच्या अनियमित वेळा, प्रक्रिया केलेले किंवा तेलकट पदार्थ खाणे, मद्यपानाचे वाढते प्रमाण, दीर्घकालीन ताणतणाव आणि तासनतास बसून राहणे या सगळ्यामुळे पचनसंस्थेचा नैसर्गिक ताल बिघडत आहे, तिच्या लवचिकतेमध्ये अडथळा निर्माण होत आहे.
-रुपेश कदम
अखंड धावपळीत जाणारा दिवस आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयी या गोष्टी मूकपणे पचनसंस्थेच्या आरोग्याचे नुकसान करत आहेत. नेहमीची अॅसिडिटी किंवा अधूनमधून पोट फुगणे (ब्लोटिंग) वगैरे गोष्टी आतापर्यंत दुर्लक्षित केल्या जायच्या, त्यातून आता GERD (गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिजिज), IBS (इरिटबल बॉवेल सिंड्रोम) आणि फॅटी लिव्हर सारख्या गंभीर आरोग्यसमस्या निर्माण होऊ लागल्या आहेत व या समस्या तुलनेने कमी वयाच्या लोकांना आणि अधिक तीव्रतेने त्रास देऊ लागल्या आहेत. या प्रांतातील नोकरदार व्यक्तींना, विशेषत: आपल्या तिशीत आणि चाळीशीत असलेल्यांना त्या अधिकाधिक प्रमाणात प्रभावित करू लागल्या आहेत.
डॉ. आदेशकुमार आंधळे, कन्सल्टन्ट, गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल