

Gut–Skin Axis: The Hidden Connection
sakal
डॉ. मृदुल देशपांडे
आहारमंत्र
मुरुम, एक्झिमा, सोरायसिस, कोरडी किंवा सतत खाज येणारी त्वचा, हे सगळे प्रश्न आपण बहुतेक वेळा ‘फक्त स्किनचा प्रॉब्लेम’ म्हणून पाहतो. क्रीम, लोशन, फेसवॉश बदलतो; पण थोडा वेळ बरं वाटून पुन्हा तेच सुरू होतं. फंक्शनल मेडिसिननुसार त्वचेवर दिसणारी ही लक्षणं आतड्यांत सुरू असलेल्या बिघाडाचं प्रतिबिंब असतात.