सदृढ शरीरासाठी जिमची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gym

सदृढ शरीरासाठी जिमची क्रेझ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वाढत्या हिवाळ्यासोबत शहरात जिममध्ये तरुणांची गर्दीही वाढू लागली आहे. भरदार शरीर व सदृढ व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तरुणांई अगदीच सजग होऊ लागली आहे. हिवाळ्यामध्ये जिम जॉईन करणाऱ्या तरुणांच्या संख्येत मोठीच भर पडली आहे.

हिवाळा लागला की व्यायामाची चाहूल तरुणाईला लागते. यावर्षी महाविद्यालये सुरु होण्याबाबत अजूनही काही ऑफलाइन तर काही ऑनलाइन सुरु आहेत. तसेच कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मिळालेला वेळ तरुणांनी जिममध्ये व्यायाम करून कारणी लावला. खेळ, मैदानी व्यायामासोबत आता शहरात जिमची क्रेझ वाढीस लागली आहे. मुळातच शरीरश्रम कमी झालेल्या जीवनशैलीत जिमचा व्यायाम तरुणांईसाठी महत्त्वाचा बनला आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री, व्यायामाचे आधुनिक प्रकार, स्नायूच्या आकारातील उठाव आणण्याची क्षमता या सारख्या गोष्टीचे तरुणांना आकर्षण असते. या शिवाय कॉम्प्लीमेंटरी प्रोटीन फूडचा खर्च देखील

"तरुणांना करावा लागतो. मुळातच ही व्यायाम पध्दत पाश्‍चात्य पध्दतीची असल्याने त्याचे सर्व तंत्र देखील त्याच पध्दतीचे आहे. जिममध्ये सर्वात मोठी गुंतवणूक यंत्र सामुग्रीची आहे. हिवाळ्यात चांगले पचन व योग्य वातावरणामुळे जिमच्या व्यायामाला ही स्थिती पोषकच असते. त्यामुळे तरुणांची संख्या या हंगामात जिममध्ये वाढलेली असते. जिम हा अत्याधुनिक व्यायामाचा प्रकार असला तरी सप्लीमेंटरी फूडमध्ये भारतीय आहाराचे पर्याय दिला जात आहे. वजनातील बदल व स्टॅमिना हे दोन प्रकारानुसार व्यायामाची निवड व्हायला हवी."

- सचिन सोनटक्के, युनिटी फिटनेस, होटगी रोड, सोलापूर

"जिम करण्यापूर्वी आरोग्य तपासणी केली पाहिजे. अनेक वेळा शरीरातील आजार माहित नसताना व्यायाम धोकादायक ठरू शकतो. तसेच जिमला रोज न जाता काही अंतर ठेवून गेले पाहिजे. कॉम्प्लीमेंटरी फूड हे भारतीय पध्दतीचे नैसर्गिक असावेत."

- डॉ. सचिन कुलकर्णी, ऑर्थोपेडीक तज्ज्ञ, सोलापूर

"कोरोनानंतर आरोग्या बद्दलची जागरुकता प्रचंड वाढली आहे. जिम साहित्याची मागणी देखील चांगली असते. कुटुंबासाठी ट्रेडमिल व सायकलची खरेदी केली जात आहे. सोसायटीमध्ये कॉमन जिम साहित्य बसवले जात आहेत. जिमच्या साहित्य खरेदीसोबत सर्व्हिस लागत असल्याने ऑफलाइन खरेदी केली जात आहे. हिवाळ्याचा हंगामात खरेदी वाढलेली आहे. "

- राम शिंदे, संचालक, मी. फीट, गांधी नगर, सोलापूर

शहरात अत्याधुनिक जिमची संख्या १५

एकूण जिमची संख्या ६५

लोकसंख्येनुसार जिमची आवश्‍यक संख्या १२०

loading image
go to top