GST 2025: नुकतीच GST परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेतले गेले. पूर्वीचे चार GST स्लॅब बदलून आता फक्त दोन GST स्लॅब ठेवण्यात आल्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. .कोविड-१९ नंतर लोक त्यांच्या आरोग्य आणि जीवनशैलीबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जिमला जाणं, योगा करणं किंवा सॅलोनमध्ये ग्रूमिंग करणं हे लक्झरी नसून गरज बनली आहे. फक्त तरुणच नाही तर मध्यमवयीन आणि ज्येष्ठही या सेवांचा वापर करत आहेत.परंतु, या सर्व सेवांचे दर परवडणारे नव्हते, कारण GST भरावा लागत होता. आता, GST परिषदेच्या बैठकीत फिटनेस आणि ग्रूमिंग सेवांवरील GST १८% वरून ५% करण्यात आला आहे. त्यामुळे जिम मेंबरशिप, योगा क्लासेस, हेअरकट, स्पा आणि इतर ग्रूमिंग सेवांचा खर्च कमी होणार आहे..काय बदल झाले आहेत?३ सप्टेंबरला झालेल्या ५६व्या GST परिषदेच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये त्यांनी, आतापर्यंत असलेले कराचे ४ स्लॅब– 5%, 12%, 18% आणि 28% रद्द करून आता दोनच स्लॅब ठेवले आहेत. ते म्हणजे ५% आणि १८%. या केलेल्या मोठ्या बदलामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावरचा ताण चांगलाच कमी झाला आहे..GST: कर्करोग रुग्णांना दिलासा! केमोथेरपीपासून ते औषधांपर्यंत…; जीएसटी कपातीमुळे किती खर्च येणार? वाचा संपूर्ण हिशोब.फिटनेस सेवांवर किती बचत होणार?यापूर्वी जिमची मेंबरशिप २००० रुपये असती तर १८% च्या GSTमुळे ती २,३६० रुपयांत पडायची. पण आता फक्त ५% GST असल्याने हीच मेंबरशिप २,१०० रुपयांना मिळणार आहे. यामुळे वर्षभरात तब्ब्ल ३,००० रुपयांची बचत होणार आहे..ग्रूमिंग सेवांवर किती बचत होणार?500 रुपयांच्या हेअरकटवर आधी 90 रुपये अतिरिक्त GST द्यावा लागायचा. आता हा कर फक्त 25 रुपये असेल. म्हणजेच बिल 590 रुपयांवरून थेट 525 रुपयांवर येईल. महिन्याला एकदा सॅलोनला जाणाऱ्या व्यक्तीला वर्षभरात साधारण 1,500–1,600 रुपयांची बचत करता येणार आहे..या सेवांवर होणार फायदाजिम आणि फिटनेस क्लबयोगा व मेडिटेशन सेंटरहेअरकट व सॅलोन सेवानाव्हीची दुकाने (बार्बर शॉप)स्पा व वेलनेस सेंटर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.