Hair Care : मऊ अन् सुंदर केसांसाठी आलियाच्या खास टिप्स

प्रत्येकाला आपले केसं मऊ, सुंदर आणि घनदाट असावे असे प्रत्येकालाच वाटते.
Alia Bhatt
Alia BhattSakal

Hair Care Tips : प्रत्येकाला आपले केसं मऊ, सुंदर आणि घनदाट असावे असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, बदललेली लाईफ स्टाईल आणि वातावरणातील बदल यामुळे अनेकांना केसांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

अनेकांना बॉलिवूडमधील अभिनेत्रींसारखे केसं हवे असतात. परंतु, त्यासाठी नेमकं काय करावे असे प्रश्न उपस्थित होतो. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आज आम्ही तुम्हाला अलिया भट तिच्या केसांची काळजी कशी घेते याबाबत माहिती सांगणार आहोत. अलियाची खासियत म्हणजे ती कोणत्याही मेकअपशिवाय अतिशय सुंदर दिसते. सोशल मीडियावर आलिया नो फिल्टर लूकसाठीदेखील ओळखली जाते.

निरोगी त्वचेसाठी आलिया काय करते?

1. क्लिजिंग : अलिया तिच्या केसांसोबत त्वचेचीदेखील काळजी घेते. उत्तम त्वचेसाठी केवळ पाण्याने धुवू नका, यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धूवा. यासाठी तुम्ही सौम्य साबण किंवा फेस क्लिंजर वापरू शकता.

2. टोनर : त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी नेहमी टोनरचा वापर करा. यामुळे त्वचेचा PH संतुलन ठेवण्यास मदत करते.

3. सीरम किंवा एसेंस : एसेन्स हे असे घटक आहे. ज्यामुळे धुळीशी लढण्यास मदत करते. निरोगी त्वचेसाठी तुम्ही स्किन केअर रूटीनमध्ये सीरम किंवा एसेंस समाविष्ट करू शकता.

4. व्यवस्थित करा हायड्रेट : आलियाचा असा विश्वास आहे की, जर त्वचा खूप डिहायड्रेट झाली असेल तर, कोणताही उपाय त्वचेची नैसर्गिक चमक परत आणू शकत नाही. त्यामुळे त्वचा डिहायड्रेट होऊ नये यासाठी मॉइश्चराइझ करणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

अशी घेते आलिया केसांची काळजी

केसांच्या आरोग्यासाठी आलिया तिच्या केसांना मुबलक प्रमाणात तेल लावते. याशिवाय ती आठवड्यातून दोनदा किंवा तिनदा केस धुण्याचा प्रयत्न करते.

आलिया तिच्या केसांसाठी घरगुती आणि नैसर्गिक उत्पादने वापरण्यावर भर देते. यामुळे केसांवर केमिकलचा विपरीत परिणाम होत नाही.

डिसक्लेमर : सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुहाने अशा कोणत्याही गोष्टींची शहानिशा केलेली नाही. केसांवर कोणताही प्रयोग करण्यापूर्वी एकदा अवश्य तज्ञ्जांचा सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com