

Hair Straightening Treatment Could Damage Kidneys Severely
sakal
Hair Straightening Treatment Triggers Kidney Damage in Teen: सुंदर दिसण्यासाठी मुलं आणि मुली दोघेही वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्स आणि स्टायलिंग टिप्स वापरत असतात, केस अजून खुलून आणि छान दिसावेत म्हणून वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट्स करतात. पण हे प्रोडक्ट्स आणि पार्लरमध्ये जाऊन केलेल्या वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट्स आरोग्याच्या दृष्टीने नेहमी चांगलंच असेल असं नाही. त्यांच्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात.
काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारची एक घटना घडली आहे. हेअर स्ट्रेटनिंग करायला पार्लरमध्ये गेलेल्या एक १७ वर्षांच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. ही घटना इस्रायलमध्ये घडली असून मेडिकल रिपोर्ट्सनुसार त्या मुलीच्या दोन्ही किडन्यांवर गंभीर परिणाम झाले आहेत. मात्र हे एकच प्रकरण नाही, तर मागच्या महिन्यात २५ वर्षांच्या एका मुलीला याच कारणासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. मग हेअर स्ट्रेटनिंगचा किडनी खराब होण्याशी काय संबंध आणि इतरांनी दक्षता बाळगण्यासाठी कोणत्या गोष्टीत लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.