

Harish Rana Case: Euthanasia Law in India Explained
Sakal
Supreme Court guidelines on passive euthanasia: काल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका कुटुंबाला त्यांच्या मुलाला सन्मानाने मृत्यू देण्याची परवानगी दिली. हरीश राणा नावाचा हा तरुण पंजाब विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत होता. 20 ऑगस्ट 2013 रोजी तो ज्या पीजीमध्ये राहत होता, त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर तो कायमच्या कोमासारख्या अवस्थेत गेला, ज्याला वैद्यकीय भाषेत व्हेजिटेटिव्ह स्टेट (Vegetative State) असे म्हटले जाते. डॉक्टरांनी तेव्हाच सांगितले होते की त्याच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता नाही. या घटनेनंतर व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे नेमकं काय आणि अशा परिस्थितीत इच्छामरणाचा प्रश्न का निर्माण होतो, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.