

Hartalika Vrat: A tradition of love, choice and devotion.
Sakal
स्त्री व पुरुष ही जोडी एकत्र आल्याशिवाय विश्वाचे चक्र फिरू शकत नाही. यासाठी निसर्गाने एक मोठा चमत्कार घडवून केवळ मनुष्यमात्राच्याच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांच्या पेशी-पेशीमध्ये कामशक्तीचे प्राबल्य आणि विरुद्ध लिंगाचे आकर्षण पेरून ठेवले आहे. पुरुष व स्त्री एकमेकांसमोर आले नाहीत तरी कामशक्तीचे प्राबल्य त्याला मिलनासाठी उद्युक्त करत राहते. विरुद्ध लिंगी आकर्षण असल्यामुळे सहवास घडला तर एकत्र यावे व निसर्गचक्राला गतिमान करावे ही इच्छा झाल्याशिवाय राहात नाही. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन मुलाला जन्म दिला तरच निसर्गचक्र गतिमान राहते असे नव्हे. हा संपूर्ण विश्वपसारा चालण्यासाठी, या जगतातील मानवतेला उत्कर्ष, सुखसमाधान व आनंद मिळण्यासाठी मूळ घटक आहे कुटुंब. ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम व त्यानंतर संन्यासाश्रम अशी योजना ओळखून भारतीयांना त्याची व्यवस्था केली.