
Early Signs of Colon Cancer
sakal
थोडक्यात:
कॅन्सर हा गंभीर व जीवघेणा आजार असून त्याच्या अनेक प्रकारांपैकी कोलन कॅन्सर महत्त्वाचा आहे.
सुरुवातीला शांतपणे वाढत असल्याने कोलन कॅन्सरची लक्षणं लगेच ओळखू येत नाहीत.
वेळेत निदान आणि तपासणी केल्यास उपचार अधिक परिणामकारक होऊ शकतात, असं डॉ. सौरभ सेठी सांगतात.
अनेक गंभीर आणि जिवघेण्या आजारांपैकी एक म्हणजे कॅन्सर. कोणताही प्रकारचा कॅन्सर हा सहजरित्या बरा होत नाही आणि याच्या अनेक गंभीर प्रकारांपैकी एक म्हणजे कोलोन कॅन्सर. सुरुवातीला शांतपणे वाढत जाणारा हा कॅन्सर बहुतेक वेळा लक्षातदेखील येत नाही. त्यामुळेच त्याचं वेळेत निदान होणं आणि तपासणी करणं महत्त्वाचं आहे, असं हार्वर्ड आणि स्टॅन्फोर्डमध्ये शिक्षण घेतलेल्या गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलं आहे.