

How Modern Oncology Is Helping Cancer Patients Save Their Voice
sakal
Head and Neck Cancer Voice Preservation: भारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. या कर्करोगांमध्ये तोंड, घसा (आवाजपेटी), थायरॉईड, सायनस, नाक तसेच लाळग्रंथी यांचा समावेश होतो. यापैकी आवाजपेटीचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक वर्षे या कर्करोगावर संपूर्ण आवाजपेटी काढून टाकणे (टोटल लॅरिंजेक्टॉमी) हा सर्वोत्तम उपचार मानला जात होता.
जरी यामुळे कर्करोग बरा होण्याचे प्रमाण चांगले होते, तरी रुग्णाचा आवाज कायमचा हरपायचा. मात्र आजच्या प्रगत तपासणी आणि उपचारांमुळे बहुतेक रुग्णांमध्ये आवाजपेटी जपण्यावर भर दिला जातो.