Doctor treatment
sakal
पुणे - कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मज्जासंस्थेचे आजार, श्वसन विकार आदी आजारांच्या रुग्णांना दीर्घकाळ उपचार व सतत काळजीयुक्त सेवांची गरज भासते. यासाठी शारीरिक वेदना निवारण, मानसिक व सामाजिक आधार, कुटुंबीय समुपदेशन या सेवांचा समावेश आहे.
या सेवा जवळील आरोग्य केंद्रात व प्रसंगी घरपोच पुरविण्यात येणार आहेत. त्यातून जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेली उपचार सुविधा अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत मोफत पुरविण्यात येणार आहेत.