
Black Raisins : दुध प्यायला अनेकांना आवडते. दुध प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. दुधामध्ये सुकामेवा मिसळून खाण्याचा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. या ड्रायफ्रूट्समध्ये काळ्या मनुकांचा देखील समावेश आहे. काळे मनुके दुधात मिसळून खाल्ल्याने दुधाचे पोषण तर वाढतेच शिवाय, मनुका पचायला ही सोपा जातो. एवढेच नव्हे तर काळे मनुके दुधात मिसळून खाणे, आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.