Health Care News: प्लास्टिकच्या डब्यातून जेवण देताय ...सावधान

प्लास्टिकच्या डब्यात अन्न ठेवणे कितपत सुरक्षित आहे, काय सांगतात तज्ञ...
Health Care
Health Care sakal

नागपूर: वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. मात्र तरीदेखील प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, म्हणून बंदी घातली आहे. मात्र एक लक्षात घेण्याची गरज आहे.

मुलांना शाळेत जाताना जेवणाचा डबा देताना प्लास्टिकचा डबा वापरला जातो. लहान मुलांना प्लास्टिकच्या डब्यातून जेवणाचा डबा देऊ नका. घरी देखील प्लास्टिकच्या प्लेट्स वापरल्या जातात.

जेवण गरम करून प्लास्टिकमध्ये ठेवल्यास, त्याचा आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. आरोग्यासाठी हानिकारक असूनही याकडे पालकवर्ग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.

प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न ठेवल्यास प्लास्टिकमधील काही घातक केमिकल्स आपल्या जेवणात मिसळू शकतात. हे केमिकल्स डोळ्यांनी दिसत नसले तरी ते हळूहळू आपल्या शरीराचे नुकसान करतात.

प्लास्टिकच्या डब्यात ठेवले जाणारे पदार्थ किती गरम आहेत, यावरून खाद्यपदार्थ किंवा पाण्यात किती केमिकल्स मिसळली हे समजतं. खूप गरम अन्न प्लास्टिकच्या भांड्यात ठेवल्यास ‘एंडोक्रिन डिस्ट्रक्टिंग’ हे विषारी केमिकल मिसळण्याची भीती आहे.

Health Care
Blood Pressure: वाढलेला रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी काय कराल? दररोज प्या हे हेल्दी ड्रिंक्स

सायनामुळे आरोग्‍य धोक्‍यात

  • हार्मोन्सचे संतुलन बिघडते

  • गरम जेवण वारंवार ठेवल्यास कॅन्सरची भीती

  • वजन वाढते

  • वजन वाढले की, इतर आजारांना निमंत्रण

हे लक्षात ठेवा...

  • प्लास्टिकच्या पाण्याची बाटली गरम होऊ देऊ नका

  • रणरणत्या उन्हात प्लास्टिकची पाण्याची बाटली ठेवू नका

  • बाटली गरम झाल्यास त्यातील केमिकल्स पाण्यात मिसळतात.

  • प्लास्टिकच्या पिशवीत चहा घेऊ नका

  • लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजू नका

  • प्लास्टिकची बाटली मायक्रोव्हेवमध्ये, गॅसवर गरम करू नका

  • बाहेरून आणलेले अन्नदेखील मायक्रोव्हेवमध्ये गरम करू नका

प्लास्टिकची भांडी तयार करताना प्लास्टिक जास्त काळ टिकून राहावे, म्हणून त्यात बीपीए (बिसफिनॉल-ए) रसायन वापरतात. मात्र भांडी बीपीए फ्री असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण प्लास्टिकच्या भांड्यातून भोजन करतो, तेव्हा हे बीपीए तत्व आपल्या आहारासोबत आपल्या पोटात जाते. बीपीए अतिघातक तत्व नसले तरी, त्यामुळे अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळते. शरिरात बीपीएची मात्रा वाढल्यास हार्मोनल असंतुलन, वजन वाढणे आणि पुढे जाऊन कर्करोगाचा धोकासुद्धा निर्माण होतो. याउलट धातूंची भांडी बीपीए फ्री असतात.

-डॉ. रेणुका माईंदे, आहारतज्ज्ञ, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com