Winter Soups: आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? मग हे हेल्दी सूप नक्की ट्राय करा

आजपासूनच हे' सूप प्यायला करा सुरुवात, सर्दी-खोकल्याचा होणार नाही त्रास
Winter Soups: आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? मग हे हेल्दी सूप नक्की ट्राय करा

सध्या सातत्याने वातावरण बदलत आहे, अशा परिस्थितीत आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. सर्दी-खोकल्याची समस्या आपल्याला सर्वात जास्त सतावते. जरी ही एक सामान्य समस्या आहे, परंतु कधीकधी यामुळे खूप त्रास होतो. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरमागरम पदार्थांचा आहारात समावेश करावा.

हिवाळ्यात प्रत्येकाने सूप सेवन केले पाहिजे. सूप रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि शरीराला उबदार ठेवण्याचे काम करते. सूप तयार करणे खूप सोपे आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. एकीकडे थंडीपासून शरीराचे संरक्षण करावे लागते तर दुसरीकडे विषाणूजन्य संसर्गापासून शरीराचे संरक्षण करावे लागते.

जर एखाद्याला हिवाळ्यात सर्दी आणि घसादुखी सुरु झाली तर त्याला याचा खूप त्रास होऊ लागतो. यामुळे व्यक्तीला ना काम व्यवस्थित होते ना शांत झोप लागते.

सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या वेळी औषधांऐवजी हे सूप वापरून पाहू शकता. हे सूप बनवायला खूप सोपे आणि प्यायला चविष्ट आहे.

मशरूम सूप

मशरूममध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात जे आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. हे करण्यासाठी कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्या. मशरूमचे लहान तुकडे करा आणि पाणी घालून उकळवा. वाफेवर काही मिनिटे शिजू द्या. शेवटी थोडे दूध घालून काही मिनिटे शिजवा. यानंतर गरमागरम सर्व्ह करा.

Winter Soups: आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? मग हे हेल्दी सूप नक्की ट्राय करा
Healthy Soup Recipes: हिवाळ्यात हेल्दी आणि निरोगी राहायचंय? मग या हिरव्या भाज्यांचे सूप जरूर प्या

मिक्स व्हेजिटेबल सूप

मिक्स व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी कढईत थोडं तेल टाका आणि त्यात चिरलेला कांदा आणि तुम्हाला कोणत्या व्हेजिटेबल्सचा सूप बनवायचा आहे ते टाका. सर्व भाज्या नीट मिसळा. आता त्यात थोडे पाणी घालून 10 ते 15 मिनिटे शिजवा. चव वाढवण्यासाठी तुम्ही मीठ आणि काळी मिरी वापरू शकता.

टोमॅटो सूप

तुळशीचे आणि टोमॅटोचे सूप देखील सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास प्रभावी आहे. सूपमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.

सूप बनवण्यासाठी तेलात लसूण तळून त्यात चिरलेला टोमॅटो आणि मीठ घाला. थोडा टोमॅटोचा रस घाला आणि चांगले मिसळा. नंतर त्यात तुळशीची पाने टाका आणि नीट मिक्स करून गरमागरम सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com