esakal | कोरोनावर मात करणं सहज शक्य; डॉक्टरांनी सांगितला उपाय

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोनावर मात करणं सहज शक्य; डॉक्टरांनी सांगितला उपाय

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्या देशावर कोरोनाचं सावट असल्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हा विषाणू दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून आतापर्यंत अनेक जण या संसर्गामुळे दगावले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासन व डॉक्टर फ्रंटलाइनवर काम करत आहेत. परंतु, या काळात नियमांचं पालन करुन प्रशासनाला मदत करणं आपली जबाबदारी आहे. कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. परंतु, योग्य पद्धतीने काळजी घेतली तर यावर आपण सहज मात करु शकतो. म्हणूनच, डॉ. संदिप गोरे यांनी 'सकाळ ऑनलाइन'शी बोलतांना कोरोना काळात आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे सांगितलं आहे.

दरम्यान, अद्याप तरी कोरोनावर कोणतंही ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे या दिवसांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच या दिवसांमध्ये आपल्या आहारात सकस, पौष्टिक पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करणं गरजेचं आहे.