आरोग्य हीच संपत्ती

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रयत्न करत आहे. माझ्या शारीरिक आरोग्यासाठी मी चांगला आहार घेते, जंक फूड टाळते आणि नेहमीच जेवणात घरी बनवलेले पदार्थच खाते.
आरोग्य हीच संपत्ती
आरोग्य हीच संपत्तीsakal
Updated on

फिटनेस

पारुल चौधरी,अभिनेत्री

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रयत्न करत आहे. माझ्या शारीरिक आरोग्यासाठी मी चांगला आहार घेते, जंक फूड टाळते आणि नेहमीच जेवणात घरी बनवलेले पदार्थच खाते. मी शाकाहारी आहे. मला सॅलड्‌स आणि ऋतूनुसार फळे खायला आवडतात. मानसिक आरोग्यासाठी मी योगा आणि ध्यान करते. नकारात्मकता पसरवेल अशा प्रकारचे कुठलेही संभाषण किंवा बातम्या टाळते. अवाजवी वादविवादांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते आणि आनंदात राहते.

खरंतर मला घरीच व्यायाम करायला आवडतो; कारण मी तो माझ्या वेळेनुसार करू शकते. माझ्या घरी काही सर्वसाधारण जिम इक्विपमेंट्‌स आहेत, जी मी नियमितपणे वापरते. त्यामुळे माझा बराच वेळ वाचतो आणि मग मी अन्य काही गोष्टीही करू शकते.

मी सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेमध्ये करिश्माची भूमिका साकारत आहे. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे शारीरिक फिटनेस खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण मानसिकरित्या व्यवस्थित असणे गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न मी करते. मी योगा खूप वर्षांपासून करत आहे. माझी सकाळ मी सूर्यनमस्कारांसह सुरू करते. हा संपूर्ण शरीरासाठीचा व्यायाम आहे. मी १०८ किंवा त्याहूनही अधिक सूर्यनमस्कार एकाच वेळेस करू शकते. फक्त मला पुरेसा वेळ असायला हवा. मी अनेक आसनांचा सराव करते आणि शवासन, प्राणायाम आणि ध्यानासह माझा सराव संपवते.

आहाराबाबत माझे वेळापत्रक ठरवून घेतले आहे. सायंकाळचे जेवण सात वाजण्यापूर्वीच करते. अर्थातच माझ्या दिनक्रमावर ते अवलंबून असते. मी हे अनेक वर्षांपासून करत आहे. मी रात्री लवकर झोपते आणि सकाळी छान न्याहारी करते. एक महत्त्वाचा नियम म्हणजे मी कधीही माझी न्याहारी चुकवत नाही. रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे मला सकाळी भूकही लागलेली असते. सकाळी आणि दुपारच्या मध्ये मी काही फळे खाते आणि दुपारच्या जेवणात दररोज घरी बनवलेले पदार्थांचा समावेश करते. माझ्या सर्व जेवणांमध्ये सॅलड्‌स, फळे, सुका मेवा, पोषक डाळ, आमटी, भाजी आणि पोळ्या असतात. तळलेले किंवा तेलकट खाणे मी टाळते. (शब्दांकन : अरुण सुर्वे)

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

आरोग्य हीच संपत्ती आहे, हे मी मानते. आपण निरोगी असू, तरच आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे ही सर्वांचीच प्राथमिकता असायला हवी.

कुठल्याही प्रकारचा व्यायाम आणि निरागी आहार हे महत्त्वाचे आहे.

आजकालच्या जीवनशैलीनुसार आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणेही गरजेचे आहे.

आहार हा घटक आपल्या शरीरावर परिणाम करत असतो. त्यामुळे आपल्याला पोषक असलेले पदार्थ आणि जास्तीत जास्त पाणी पिणे शरीराला फायदेशीर ठरते.

धावपळीच्या युगात आपण आपल्यालाच वेळ देणे टाळतो. मात्र, हीच गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी आपण आरोग्यासाठी काढला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com