Remedies For Winter Issues: थंडीच्या दिवसांत वारंवार आजारी पडताय ? 'या' पाच गोष्टी आहारात घ्या

थंडीच्या काळात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या पालेभाज्या खा
Remedies For Winter Issues
Remedies For Winter Issuesesakal

Winter Health Tips: थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप या समस्या हमखास उद्भवतात. वारंवार शिंका येतात. हिवाळ्यात जसजशी कडाक्याची थंडी पडेल तसतश्या या समस्या वाढतील. तुम्ही वेळीच काळजी घेतली नाही तुमचा त्रास वाढेल. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही पालेभाज्या आवर्जून खाव्यात. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला पोषक तत्वही मिळतात. चला तर जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत कोणत्या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी पोषक ठरतील ते.

बीट

बीट फळ तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. तुम्ही याचं सॅलेट खाऊ शकता. बीट हे फायबरयुक्त असते. बीटमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. अनेकजण याचा सरही पितात. हिवाळ्यात बीटचे सेवन अवश्य करावे. त्याने तुम्हाला फायदा होईल. (health)

करडई

पालकपेक्षा करडईमध्ये पोटॅशिअम आणि लोह जास्त प्रमाणात असते. याला चाकवत असेही म्हटले जाते. यात कमी कॅलरीज आणि फ्रट्स असतात. हिवाळ्यात ही भाजी खाल्ल्याने बरेच फायदे होतात. आरोग्यासाठी ही भाजी अत्यंत पौष्टिक मानली जाते. यात लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. सोबतच वि़टामिन ए आणि बीही असते.

गाजर

हिवाळ्यात लोक आवर्जून गाजर खातात. यात पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर, लोह आणि विटामिन ए यांसारखे पोषक तत्व असतात. गाजरेची तुम्ही भाजी, सॅलेट किंवा खीर करूनही खाऊ शकता. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्ताभिसरणही सुरळीत होते.

लाल आणि हिरवी माठ भाजी

ज्या लोकांना अॅनिमिया किंवा अॅनिमियाच्या समस्या आहेत त्यांनी हिवाळ्यात लाल आणि हिरवा माठ या पालेभाज्या नक्की खाव्या. या भाज्यांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, लोह, विटामिन ए आणि विटामिन बी असतात. या भाज्यांनी थंडीच्या दिवसांत शरीर उबदार राहाते.

पालक

पालकमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, जीवनसत्व बी, सी आणि ई असतात. हिवाळ्यात थंडीचा सामना करण्यासाठी पालक हा उत्तम ऑप्शन मानल्या जातो. तुम्ही याचेही बरेच पदार्थ बनवून खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com