या ड्रिंकच्या मदतीने Cholesterol करा नियंत्रित

दोन प्रकारचे कोलेस्ट्रोल शरीरात असतात. या दोन्ही कोलेस्ट्रोलचं शरीरात संतुलन असणं महत्वाच आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे 200 mg/dL पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. हे प्रमाण वाढल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
कोलेस्ट्रोल नियंत्रण
कोलेस्ट्रोल नियंत्रणEsakal

अलिकडे धकाधकीचं जीवन, कामाचा वाढता ताण आणि चुकिच्या आहारामुळे आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. यातील एक महत्वाची समस्या म्हणजे मानवी शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल cholesterol हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास ताप, सर्दी, खोकल्यासारखी त्याची लक्षण लगेच दिसून येत नाही. मात्र हृदयावर Heart त्याचा गंभीर परिणाम होत असतो. अलिकडे अगदी कमी वयात ह्दयविकाराचा झटका आल्याचं आपण अनेकांकडून ऐकलं असेल. यासाठी कॉलेस्ट्रॉलची वरचे वर तपासणी करणं सध्या गरजेचं आहे. Health Tips control cholesterol with this special drink

कोलेस्ट्रॉल हे मेणा सारखं एक केमिकल असून शरिरातील हार्मोन्स Harmones आणि सेल बनवण्याचं काम ते करतं. हाय डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि लो डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रोल शरीरात असतात. या दोन्ही कोलेस्ट्रोलचं शरीरात संतुलन असणं महत्वाच आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे 200 mg/dL पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. हे प्रमाण वाढल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. हे संतुलन राखण्यासाठी काही पेय किंवा तुम्ही त्याला ज्युस, ड्रिंक म्हणू शकता ते उपयोगी ठरतात. हे हेल्दी ड्रिंक्स कोणते ज्याने बॅड कोलेस्ट्रोल कमी होवू शकतो हे जाणून घेऊयात.

ग्रीन टी (Green Tea Benefits)- कोलेस्ट्रोलच्या समस्येसाठी ग्रीन टी हा गुणकारी उपाय आहे. ग्रीन टीमध्ये असलेला कॅटेचिन हा घटक महत्वाचा आहे. यात अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL ची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेली ग्रीन टी पिणं फायदेशीर ठरतं.

डाळिंबाचा रस (Pomegranate juice benefits)- डाळिंबाच्या ज्युसचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. संशोधनानुसार डाळिंबाच्या रसामुळे केवळ कोलेस्ट्रॉलच नव्हे तर रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

सोया मिल्क (Soy milk to Control Cholesterol)- सोया मिल्क हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत समजला जातो. सोया मिल्कच्या सेवनाने हृदयविकारांच्या समस्या कमी होते. सोयामध्ये सॅच्यूरेटेड फॅटस् कमी असल्याने कोलेस्ट्रोल कंट्रोल होण्यास मदत होते.

बेरी स्मूदी- बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटचे गुण असतात शिवाय फायबरही असतं. त्यामुळे बॅड कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदक होते. बेरी स्मूदीही स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी पासून बनवावी. ही एक गुणकारी स्मूदी आहे. या स्मूदीसाठी तुम्ही सोया मिल्क वापरू शकता. या स्मूदीमध्ये कॅलरी आणि फॅटस् कमी असतात.

हे देखिल वाचा-

कोलेस्ट्रोल नियंत्रण
Heart Health : हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील हे पदार्थ

टोमॅटो ज्यूस- आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये कायम उपलब्ध असलेला टोमॅटो तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो. टोमॅटो सहज उपलब्ध असल्याने टोमॅटो ज्यूस पिणं तुम्हाला शक्य आहे. या ज्यूसमध्ये लाइकोपीन नावाचं कंपाउंड असतं ज्यामुळे शरिरातील लिपिडची मात्र वाढते परिणामी बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. या शिवाय या ज्यूसमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणार फायबर आणि नाइसिनही असतं.

कोकोआ ड्रिंक्स- कोकोआ (Cocoa) हे डार्क चॉकलेटचं मेन इंग्रीडिएंट आहे. म्हणजेच कोकोआपासून चॉकलेट बनवलं जात. कोकोआमध्ये प्लेवेनॉल नावाचं अँटिऑक्सिडंट आढळतं जे कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. याशिवाय यात मोठ्या प्रमाणात मोनो सॅच्युरेडेट फॅटी असिड असल्याने कोलेस्ट्रोलस संतुलन राखण्यास मदत होते.

ओट ड्रिंक्स- ओटस् हे देखील कोलेस्ट्रॉल नियंत्रणास ठेवण्यास उपयुक्त आहे. यात बीटा ग्लूकन्स नावाचा घटक असतो जो आतड्यांमध्ये जेल सारखा पदार्थ तयार करतो. यामुळे कोलेस्ट्रॉल शोषण्याचा रेट कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. (Improve Good cholesterol level)

या ड्रिंक्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यात मदत होईल. मात्र यासोबतच योग्य आहार घेणं तितकचं गरजेचं आहे. तसचं ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी काही ठराविक पेय घेणं टाळावं. एवढचं नव्हे तर ज्यांना कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून हेल्दी आयुष्य जगायचंय त्यांनी अधिक साखर आणि फॅटस् असलेले ड्रिंक घेण टाळावे.

हे ड्रिंक्स म्हणजेच जास्त साखर आणि क्रिम असलेली चहा, कॉफी किंवा कोल्ड कॉफी

ज्या स्मूदीमध्ये नारळाचे किंवा पाम तेल असेल त्या पिणं टाळावं.

आईस्क्रिबेस असलेल्या स्मूदी तसचं हाय फॅट असलेले ड्रींक

इनर्जी ड्रीक, सोडा, कोल्ड ड्रिंक्स

टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध असलेल्या स्मूदी

योग्य ती काळजी घेतल्यास आपण कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून हृदयाचं आयुष्य वाढूवन आपल्या आयुष्याची मजा लूटू शकतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com