Health Tips : आईचे दुध वाढवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदीक तेल वापरून बघाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health tips

Health Tips : आईचे दुध वाढवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदीक तेल वापरून बघाच!

पुणे : नुकतेच बाळाला जन्म दिलेल्या आईसाठी बाळाला छातीशी कवटाळून स्तनपान (breast feeding) करणे हे खूप उत्साह देणारे आणि प्रसुतीच्या वेदना दुर करणारे असते. प्रसुतीनंतर तीन दिवसांनी आईला दुध (breast milk ) येते.

काहीं मातांना उशीरा येते. पण, रूग्णालयातून घरी आल्यावरही दुध येत नसेल किंवा कमी प्रमाणात येत असेल तर यावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. या समस्येवर आयुर्वेद (Aayurved) मदत करू शकते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या तेलाची (oil) मालिश केल्याने मातेच्या दुधाचे प्रमाण वाढते.

बडीशेफचे तेल

बडीशेफमध्ये गॅलेक्टागॉज नावाचे पोषण तत्व असते. जे,स्तनातील दुध वाढवण्यास मदत करते. याच बरोबर ते,स्तनपान करताना स्तनात येणारी सूज कमी करते. याचा नियमीत वापर केला तर, दुधाच्या गाठी होत नाहीत.

लवेंडरचे तेल

गर्भधारणा, प्रसुतीनंतर आणि पालकत्व असे प्रसुतीचे तीन टप्पे असतात. प्रसुतीनंतरच्या सुरूवातीच्या काळात लवेंडर तेलाने स्तनांना मसाज केल्याने दुध तयार होण्याची प्रक्रीया लवकर होते.

चहाच्या पानांचे तेल

चहाच्या पानांचे तेल बाजारात सहज उपलब्ध होते. या तेलाच्या मसाजने दुध वाढण्यास मदत होते.

कॅमोमाइल तेल

स्तनातील दुध वाढवण्यासाठी कॅमोमाइल तेलाचा वापर करतात. यामुळे दुध तर वाढतेच त्याचसोबत स्तनातील दुखण्यावर प्रभावी उपाय करते.

जर्मेनियम तेल

हे तेल दुखरे आणि चीर पडलेले निपल्सचे दुखणे कमी करते.

क्लॅरी सेज तेल

ज्या मातांना सुरूवातीला दुध व्यवस्थीत असते. पण, काही दिवसांनी प्रमाण कमी होते. अशावेळी क्लॅरी सेज तेल प्रभावी ठरते.

Web Title: Health Tips Essential Oil To Increase Breast Milk Production

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..