

बिघडलेली जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि अनुवांशिंक कारणांमुळे अलिकडे कोलेस्ट्रॉलची समस्या वाढताना दिसत आहे. केवळ वयोवृद्धांमध्येच नव्हे तर तरुणांमध्ये देखील कोलेस्ट्रॉलची Cholesterol समस्या वाढताना दिसते. अनेकजणांना तरुणवयातच हृदयाशी संबंधित विकार जडल्याचं दिसून येतंय. Health Tips Marathi Arjuna Tree Skin for Bad Cholesterol Treatment
कोलेस्ट्रॉल Cholesterol हा एक असा पदार्थ आहे जो तुमच्या रक्तामध्ये वाढल्यास तो नसांमध्ये साचू शकतो. यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होवून रक्तप्रवाहावर परिणाम होवून उच्च रक्तदाब तसंच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा Heart Problems धोका वाढतो.
कोलेस्ट्रॉलही अशी समस्या आहेत जिची सुरुवातीच्या काळामध्ये कोणतीही लक्षण दिसून येत नाहित. मात्र यामुळे अचानक कधीही तुम्हाला आरोग्याची एखादी गंभीर समस्या उद्भवू शकते. यासाठीच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला अर्जुनाच्या झाडाची साल उपयुक्त ठरू शकते.
अर्जुनाच्या झाडाचं आयुर्वेदात मोठं महत्व आहे. या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. खास करून अर्जुनाच्या सालीमुळे हृदयाचे अनेक विकार दूर करण्यासाठी मदत होते. याच अर्जुनाच्या सालीच्या चहाचं सेवन केल्यास रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
हे देखिल वाचा-
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अर्जुनाची साल
अर्जुनाच्या सालीमध्ये फ्लेवोनॉइड, ग्लायकोसाइड, फेनोलिक अॅसिड आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स तसंच अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होवून गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अर्जुनाची साल उपयुक्त ठरते. यासाठी तुम्ही अर्जुनाच्या सालीचं सेवन करू शकता.
असा तयार करा अर्जुनाच्या सालीचा चहा
अर्जुनच्या सालीचा चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात १ ग्लास दूध तापवत ठेवा. त्यानंतर त्यात अर्जुनाची साल टाका. तसंच तुम्ही या सालीची पावडरही चहा तयार करण्यासाठी वापरू शकता. दूध अर्ध होईपर्यंत चांगलं उकळवा. अशा प्रकारे तयार अर्जुनाच्या सालीच्या चहाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
अर्जुनाच्या सालीच्या चहाचे फायदे
या चहाच्या सेवनामुळे केवळ कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होत नाही तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसचं या चहाच्या सेवनांमुळे रक्तवाहिन्या आकुंचन आणि प्रसणर होण्यास मदत होते. यामुळे बल्ड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसचं रक्ताभिसरण सुरळीत होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.