Monsoon मध्ये दुधाचं सेवन ठरू शकतं आरोग्यासाठी घातक, पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ देखील खाणं टाळा

Rainy season diet: इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल्यांसाठी पावसाळ्यामध्ये खास काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी पावसाळ्यात आजारांना दूर ठेवण्यासाठी स्वच्छता आणि पौष्टिक आहारावर लक्ष देणं गरजेचं असतं
foods to avoid in monsoon
foods to avoid in monsoonEsakal

Foods to avoid in monsoon: पावसाळ्यामध्ये वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटू लागतं. पावसाळ्यात उन्हाळ्यातील गरमीपासून Summer Heat सुटका मिळत असली तरी या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. Health Tips Marathi Avoid Milk in Monsson Season

पावसाळा Monsson हा आपल्यासोबत अनेक आजारांना सोबत घेऊन येत असतो. पावसाळ्यामध्ये दमट वातावरण आणि घाणीमुळे बॅक्टेरिया Bacteria वाढण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्याच्या काळामध्ये वायरस आणि बॅक्टेरियामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो.

खास करून इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल्यांसाठी पावसाळ्यामध्ये खास काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी पावसाळ्यात आजारांना दूर ठेवण्यासाठी स्वच्छता आणि पौष्टिक आहारावर लक्ष देणं गरजेचं असतं.

निरोगी राहण्यासाठी इतर ऋतूंमध्ये आपण अनेक पदार्थांचं सेवन करत असतो. मात्र यातील काही हेल्दी पदार्थ पावसाळ्यात मात्र आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. असे काही पोषक पदार्थ आहेत ज्याचं पावसाळ्यामध्ये सेवन करणं टाळावं. यातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ किंवा पेय म्हणजे दूध.

पावसाळ्यात दुधाचं सेवन हानिकारक

दुधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हाडं बळकट होण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दूध पिणं गरजेचं असतं. मात्र हे हेल्दी दूध पावसाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुधाचं सेवन न करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

पावसाळ्यामध्ये डेअरी प्रोडक्ट Dairy Products म्हणजेच दूध आणि दह्यासारख्या पदार्थांचं सेवन टाळावं. तज्ञांच्या मते पावसाळ्यात वातावरणामुळे डेअरी प्रोडक्टस् मध्ये जर्म्स म्हणजेच किटाणू वाढण्याची शक्यता जास्त असते. परिणामी अशा पदार्थांच्या सेवनामुळे पोटदुखी, डायरिया सारखे आजार होवू शकतात.

आयुर्वेदातही Ayurveda पावसाळ्यात दह्याचं सेवन व्यर्ज सांगण्यात आलं आहे. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वात वाढतो तसचं पित्ताचाही त्रास वाढू शकतो. दही हे थंड असल्याने पावसाळ्यात त्याचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. दह्याच्या सेवनामुळे पचनासंबधीच्या समस्या निर्माण होवू शकतात. तसचं कमी इम्युनिट असलेल्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होवू शकतो.

हे देखिल वाचा-

foods to avoid in monsoon
Boil Milk: एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

पावसाळ्यामध्ये असं करा दुधाचं सेवन

जर तुम्हाला नियमितपणे दूध पिण्याची सवय असेल आणि पावसाळ्यातही तुम्हाला दुधाचं सेवन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता. पावसाळ्यामध्ये दुधाचं सेवन करण्यापूर्वी दूध उकळताना त्यात थोडीशी हळद टाकावी. हळदीच्या दूधाच्या सेवनामुळे बॅक्टेरीचा धोका कमी होवून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल.

हळदीच्या दुधामुळे पावसाळ्यात सर्दी-खोकल्यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून तुम्ही दूर राहू शकाल.

पावसाळ्यातमध्ये या पदार्थांचं सेवन टाळा

जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी भाज्यांचं सलाड खात असाल तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला सलाडला दुसरा पर्याय शोधावा लागेल. कारण या काळामध्ये वातावरणात ओलावा असल्याने विविध फळभाज्या आणि पिकांवर किडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कच्च्या भाज्यांचं सेवन टाळावं.

जर तुम्हाला आहारात भाज्यांचा समावेश करायचा असेल तर त्या योग्यरित्या पूर्ण शिजवूनच त्यांचं सेवन करावं.

त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये पावसाच्या सरींनी भिजल्यावर गरमागरम भजी किंवा समोसे खाण्याचा मोह अनेकांना होतो मात्र या पदार्थांच्या जास्त सेवनामुळे आरोग्य बिघडू शकतं. या पदार्थ्यांच्या सेवनामुळे अपचन, बद्धकोष्ठता, सूज अशा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com