गुडघेदुखी टाळण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे, सतत बसून राहणे टाळले पाहिजे. याशिवाय दररोज काही मिनिटे स्वतःच्या आरोग्यासाठी दिल्यास व व्यायाम केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
कोल्हापूर : सतत मोबाईलच्या वापरामुळे तरुणींना मानदुखीचा त्रास (Neck Pain) सहन करावा लागत आहे. केवळ वयाच्या पस्तीशीतील या तरुणी मानदुखीने त्रस्त होऊन अस्थिरोगतज्ज्ञांकडे (Osteopaths) तपासणीसाठी येत आहेत. मोबाईलचा वाढलेला वापर आणि स्वयंपाक किंवा इतर कामे करताना सतत मान खाली असणे यामुळे मानदुखीचे दुखणे वाढल्याचे चित्र आहे.