Health Tips : प्री-डायबिटीज रिकव्हर होऊ शकतो का? ; या घरगुती उपायांनी शुगर करा कंट्रोल!

जेवणानंतर 2 तासांनंतर रक्तातील ग्लुकोज 7.8-11.0 mmol/L असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला प्री- डायबिटीज आहे.
diabetes
diabetesgoogle

पुणे : मधुमेह, शुगर किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा गंभीर आजार आहे. दुर्दैवाने, मधुमेहावर कायमस्वरूपी कोणताही उपचार नाही. पण ते नियंत्रणात ठेवल्यास आपण सामान्य जीवन जगू शकता.

डॉक्टर रुग्णांना निरोगी आहार आणि मध्यम व्यायामाचे पालन करण्याचा सल्ला देतात. या आजारात शरिरातील साखरेची लेव्हल वाढते पण ती मधुमेह होईल एवढी धोक्याची नसते. यालाच प्री- डायबिटीज म्हणतात.

प्री- डायबिटीज समजून घेण्यासाठी, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. चीन आरोग्य एजन्सी FHS च्या अहवालानुसार, जर जेवणाआधी रक्तात ग्लुकोज 5.6-6.9 mmol/L असेल. आणि जेवणानंतर 2 तासांनंतर रक्तातील ग्लुकोज 7.8-11.0 mmol/L असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला प्री- डायबिटीज आहे.

जर आहार आणि व्यायामाकडे लक्ष दिले नीही तर, प्री-डायबिटीज असलेले बहुतेक लोकांना पुढील दहा वर्षांत टाइप 2 डायबिटीज होईल. आता प्री-डायबेटिस ठिक होतो का?, रक्तातील साखर नॉर्मल ठेवता येते का?, हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. त्यावर आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार काय म्हणतात हे पाहुयात.

आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत. ज्या प्री-डायबिटीस ठिक करण्यात मदत करू शकतात. साखरेची पातळी कंट्रोल करून टाइप 2 आणि टाइप 1 डायबिटीजपासून आपले रक्षण करू शकतात.

मेथीचे दाणे

मेथीचा गुणधर्म गरम असून ती चवीला कडू असते. मेथीची चव हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलसाठी मेथी उपयोगी आहे. मेथीच्या सेवनाने वेगाने वाढणारी रक्तातील साखर कमी होते. मेथी ग्लूकोज इनटोलरेंस सुधारते आणि कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स देखील कमी करते.

कसे घ्यावे

मेथीच्या दाण्यांची पावडर करून ठेवा. रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना १ चमचा पावडर कोमट पाण्यातून घ्यावी. तसेच, रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.

काळी मिरी

रक्तातील शुगर लेव्हल कमी करण्यासाठी काळी मिरी मदत करते. मीरीमध्ये 'पाइपेरिन’ हा घटक असतो. हा घटक शुगर कंट्रोल करायला मदत करतो.

कसे घ्यावे

कुटून बारीक केलेली काळे मिरे आणि हळद एक ग्लास पाण्यातून घ्यावे. हे मिश्रण तुम्ही सकाळी घेऊ शकता किंवा रात्री झोपण्याच्या तासभर आधी घ्यावे.

दालचिनी

दालचिनी प्रत्येक मसाल्याच्या डब्यात सापडतेच. दालचिनी इंसुलिन इनटोलरेंस कमी करते. जेवण झाल्यानंतर शुगरमधील स्पाइक्स कमी करण्यास मदत करते.

कसे सेवन करावे

१ चमचा दालचिनीमध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मेथी पावडर मिक्स करून रिकाम्या पोटी सेवन करावी.

आवळा

डायबिटीज कंट्रोल करण्यात सर्वात प्रभावी आवळा समजला जातो. आवळा शुगर लेव्हल कंट्रोल करतो. शरिरातील अतिरीक्त कफ कमी करण्यास आवळा गुणकारी आहे. तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यातही आवळा मदत करतो.

कसे घ्यावे

१ चमचा आवळा पावडर आणि हळद पूड समप्रमाणात घेऊन रिकाम्यापोटी सेवन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com