Fasting Tips : दिवसभर उपवास केल्यानंतर लगेचच खाऊ नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील दुष्परिणाम

दिवसभर उपवास केल्यानंतर रात्रीच्या वेळेस उपवास सोडताना आपण कोणकोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करणार आहात, याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
Fasting Tips
Fasting TipsSakal

Fasting Tips : उपवास केल्याने आरोग्यास अगणित लाभ मिळतात. उपवास केल्यास शरीर पूर्णतः डिटॉक्स होण्यास मदत मिळते आणि शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहते. पण संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर उपवास सोडताना बरीच मंडळी पंचपक्वान्नावर ताव मारतात. 

Fasting Tips
Quitting Smoking Benefits धूम्रपानाचे व्यसन सोडल्यास मानसिक आरोग्यावर होतील हे परिणाम - रीसर्च

यामुळे शरीरास फायदे होण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते. दिवसभर उपाशी राहिल्यानंतर आपण कोणकोणत्या पदार्थांचे सेवन करताय, याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कारण यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. उपवास सोडताना कोणकोणत्या पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Fasting Tips
World Coconut Day 2023 : नारळाच्या तेलामुळे आरोग्यापासून ते त्वचा-केसांपर्यंत मिळणारे अगणित लाभ, जाणून घ्या सविस्तर

उपवास सोडताना कोणत्या पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे? 

  • झणझणीत पदार्थांचे सेवन करणं टाळावे. कारण रिकाम्या पोटी तिखट-तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

उदाहरणार्थ - पोटदुखी, अपचन, गॅस इत्यादी.

Fasting Tips
आहार‘मूल्य’ : डाळी, उसळी आणि पोषणमूल्ये
  • आंबट-तुरट फळे खाऊ नयेत. रिकाम्या पोटी अशी फळे खाल्ल्यास अपचन व अ‍ॅसिडिटी समस्या निर्माण होऊ शकते. 

  • काही जणांना उपवासादरम्यान सतत चहा व कॉफी पिण्याची सवय असते. यामुळे आरोग्यावर गंभीर स्वरुपातील परिणाम होण्याची शक्यता असते.

  • वारंवार चहा कॉफी प्यायल्याने शरीराच्या चयापचयाची क्षमता कमकुवत होते आणि यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्याही होऊ शकते.

उपवास सोडताना कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

  • उपवासामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी उपवास सोडण्याच्या काही वेळआधी एक ग्लास पाणी प्यावे. 

  • यानंतर आपण एखाद्या फळाचा ज्युस पिऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. 

  • तसंच उपवासाच्या थाळीमध्ये प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा. ज्यामुळे शरीराला पोषकघटकांचा पुरवठा होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com