
Health Updates : दही खाताय थोडं, थांबा!
दह्यानंतर काही गोष्टींचे सेवन केल्यास शरीरात अॅलर्जी किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. दही खाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये आणि त्यामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते. याचा विचार करावा. अनेक लोकांसाठी जेवणात दही खाण्याची सवय असते. दही जेवणाची चव वाढवते, परंतु चवीलाच नाही तर दह्याचे सेवन अनेक समस्यांपासून वाचवू शकते.
हे टाळावे..
दह्यासोबत दुधाचे सेवन करू नये.
दह्यासोबत कांदा कधीही खाऊ नये.
ऍलर्जीचा सामना करावा लागू शकतो.
पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकते.
दह्यानंतर लोणच्याचेही सेवन करू नये.
दह्यासोबत इतर कोणत्याही पेयाचे सेवन टाळावे.
दही खाण्याचे फायदे
दही खाण्यामुळे पोटाच्या विकारावर फायद्याचे असते.
दह्यामुळे पचनतंत्र योग्यरित्या कार्य करते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो, शरिराची हाडे मजबूत होतात.
कोलेस्ट्रॉल वाढत नाही, शरिराची रोगप्रतिकारकशक्ती बळकट होते.
काय करू नये ?
दह्यानंतर गरम वस्तूंचे सेवन करू नये. त्यामुळे शरीरात सर्दी तसेच आणि उष्णतेची समस्या उद्भवू शकते.दह्यानंतर किंवा त्याच्यासोबत तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
दही खाल्यानंतर तळलेले पदार्थ खाल्ले तर ते आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकतात.तसेच पचनाच्या गतीवर देखील याचा नकारात्मक परिणाम होवु शकतो.
Web Title: Health Updates Eating Curd Can Cause Problems Health Tips
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..