
Healthy Lifestyle Tips: वयाच्या पन्नाशीनंतर शरीरात आणि मनात बदल जाणवू लागतात. केस पांढरे होणे, चष्म्याची गरज भासणे, थकवा जाणवणे ही वृद्धत्वाची सुरुवात मानली जाते. मात्र, वय वाढले तरीही मनातील उत्साह आणि उभारी टिकून असते. यामुळे अनेक जण सक्रिय राहतात, पण आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन त्रास होऊ शकतात. म्हणूनच या टप्प्यावर शरीर आणि मनाच्या देखभालीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.