Self improvement and social media envy : तुलना- कैद करणारी

Healthy vs Unhealthy Comparison psychology : तुलना ही मानवी स्वभावाची सहज प्रवृत्ती असली तरी, दुसऱ्याच्या 'हायलाईट रील'शी स्वतःच्या आयुष्याची स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्याच प्रगतीवर लक्ष केंद्रित करून निकोप स्पर्धा करणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अधिक फायदेशीर ठरते.
Self improvement and social media envy

Self improvement and social media envy

esakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

ही  जुनी गोष्ट तुम्ही ऐकली असेल- बेडकीच्या पिल्लांनी एकदा बैल पाहिला आणि त्या ‘मोठ्ठ्या’ प्राण्याविषयी ती आईला सांगू लागली. ते ऐकून अस्वस्थ झालेली बेडकी ‘आपणही मोठे दिसू शकतो,’ असं म्हणून स्वत:ला फुगवत राहिली... आणि शेवटी ती फुटली.

एक महत्त्वाचा प्रश्‍न आपण स्वतःला विचारत नाही- ज्या गोष्टीत मी दुसऱ्यासारखा व्हायचा प्रयत्न करत आहे, ती गोष्ट माझ्यासाठी खरोखर साध्य, सुसंगत आणि वास्तववादी आहे का? हा विचार न केल्यामुळे तुलना अनेकदा आंधळी स्पर्धा होते. मग आपण ध्येयाकडे नाही तर फक्त दुसऱ्याच्या सावलीच्या मागे भरकटत राहतो.

तुलना ही आपल्याला रोज जाणवणारी आणि अगदी सहज घडणारी मानसिक सवय आहे! ‘गीताच्या मुलाला किती चांगले मार्क्स मिळाले’, ‘तिने बघ किती पटकन प्रमोशन मिळवलं’, ‘ती माझ्याच वयाची आहे, पण कित्ती काय काय करते ती! आणि मी...’ तुलना म्हणजे स्वतःकडे किंवा आप्तस्वकीयांकडे, आपल्या परिस्थितीकडे दुसऱ्याच्या संदर्भातून बघणे. मग तुलना करायचीच नाही का? ते खरंच शक्य आहे का? प्रामाणिक उत्तर असं, की तुलना न करणे अवघड आहे. परंतु तुलना कशी करावी हे शिकता येऊ शकतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com