

A healthy school environment, qualified teachers, and quality infrastructure are essential for student development and lifelong learning.
Sakal
आरोग्याची त्रिसूत्री म्हणजे प्रकृती, मनोधर्म किंवा स्वभाव आणि कर्मकुशलता यांचे संपूर्ण संतुलन. मनुष्याच्या आरोग्याची व्याख्या करताना दोष, धातू, मल हे प्रकृतीचे संतुलित गुण, प्रसन्न मन ही मनाची उन्नत अवस्था आणि आत्म्याचे समाधान ही आरोग्याची शेवटची पायरी समजून जशी व्याख्या केली तशीच व्याख्या कुठलीही कार्यपद्धती, संस्था, वस्तुजात वा यंत्र यांच्या आरोग्याबद्दलही करता येईल.
विद्याभ्यास करण्यासाठी जेथे सर्व तऱ्हेच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत असे ठिकाण म्हणजे ‘शाळा’! विद्याभ्यास करण्यासाठी जशी वह्या-पुस्तके, वाचनालय, बाक, फळा वगैरे गोष्टी आवश्यक असतात, तशीच शाळेत शिक्षकांची नितांत आवश्यकता असते. एकूणच शाळेचे वातावरण विद्यार्थ्याला अभ्यास करायला अनुकूल असले तरच असे म्हणता येईल की त्या शाळेचे आरोग्य चांगले आहे. मुलाच्या आयुष्यातला बराच मोठा कालखंड किंवा दिवसाचा बराच मोठा म्हणजे जवळ जवळ ३०-३५% वेळ शाळा-कॉलेजात व्यतीत करावा लागतो. आयुष्यात उपयोगी पडणारे महत्त्वाचे गुण शिक्षणानेच मिळत असतात आणि म्हणूनच शाळेचे वातावरण प्रज्ञासंस्कारासाठी उत्तम असावे लागते.