Side Effects Of Sitting Long Time: जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यास होऊ शकतात 'हे' आजार

Side Effects Of Sitting Long Time: तासंतास एकच जागी बसून काम केल्याने कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया.
Side Effects Of Sitting Long Time
Side Effects Of Sitting Long TimeSakal

healthy tips how harmful long hours of sitting poor posture diabetes

बराच वेळ एका जागी बसूने आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त वेळ बसून राहिल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांना कसे सामोरे जावे हे जाणून घेऊया.

एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्याने आरोग्यावर पुढील दुष्परिणाम होतात

  • लठ्ठपणा वाढतो

जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्याने वजन वाढू शकते. वजन वाढल्याने अनेक आजार निर्माण होऊ शकतात. एकाच जागी बसल्याने कॅलरीज् बर्न होत नाही. यासाठी रोजच्या दिनचर्येत व्यायाम आणि योग करावा.

  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका

दीर्घकाळ बसून काम केल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकसह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार वाढू शकतात. असे रक्तप्रवाह आणि पचन सुरळित होत नसल्याने होते. यासाठी काम करताना एका तासाने उभे राहावे किंवा चालावे. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पोहणे, चालणे , योग करणे गरजेचे आहे.

  • शरीराचा आकार खराब

जास्त वेळ बसून काम केल्याने पाठ वाकणे, मणक्याचा त्रास सुरू होऊ शकतो. यामुळे काम करताना ताठ बसावे. बसायला योग्य खुर्ची घ्यावी. काम करण्यासाठी एक जागा निश्चित करावी. तसेच काम करताना 5 ते 10 मिनिटांची विश्रांती घेऊन फिरून यावे.

  • टाइप 2 मधुमेहाचा धोका

एकाच जागी बसून जास्त वेळ काम करत असाल तर टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. कमी झालेल्या इंसुलिनची संवेदनशीलता आणि बिघडलेले ग्लुकोज चयापचय यामुळे हा आजार होऊ शकतो. अशावेळी रोज सकाळी व्यायाम किंवा योगा करावा. तसेच तुम्ही कामातून थोडा वेळ काढून फिरून येऊ शकता.

Side Effects Of Sitting Long Time
Heat Stroke: उष्माघात कोणाला होऊ शकतो अन् बचावासाठी काय करावे, वाचा सविस्तर
  • पाठदुखी आणि सांधेदुखी

जास्तवेळ बसून राहिल्याने पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखी वाढू शकते. एकाच जागी बसून काम केल्याने स्नायूंची हालचाल होत नाही. यामुळे काम करताना थोडा वेळ उभे राहावे, चालायला जावे किंवा हात आणि पायांना स्ट्रेच करावे. तसेच तुम्ही फिजिकल थेरेपि घेऊ शकता.

  • मानसिक आजार

जास्तवेळ बैठे काम केल्याने मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामध्ये नैराश्य आणि तणाव वाढू शकतो. रोजच्या दिनचर्येत व्यायाम आणि योगाचा समावेश करावा. व्यायाम केल्याने मुड चांगला राहतो तसेच नैराश्य आणि तणाव कमी होतो. यासाठी पाच मिनिटं फिरून यावे किंवा स्ट्रेचिंगल करावे.

  • आयुर्मान कमी होणे

काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की जास्तवेळ बसून काम केल्याने आयुर्मान कमी होऊ शकते. यामुळे बैठे काम असले तरी थोडावेळ ब्रेक करून बाहेर फिरूण यावे. यामुळे शरीराची थोडी हालचाल होते. यामुळे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळते. बैठे कामामुळे होणारे आजार दूर ठेवायचे असेल तर चालणे, विश्रांती घेणे, तसेच योग करणे यासारख्या गोष्टी कराव्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com